उबाठा सेनेच्या देवगड शहरप्रमुखपदी विशाल मांजरेकर तर उपशहरप्रमुखपदी गणेश कांबळी, प्रफुल्ल कणेरकर यांची नियुक्ती…

⚡देवगड ता.१५-:
उबाठा शिवसेनेच्या देवगड शहरप्रमुखपदी विशाल मांजरेकर तर नगरपंचायत विरोधी पक्षनेतेपदी नितीन बांदेकर, उपशहरप्रमुखपदी गणेश कांबळी आणि प्रफुल्ल कणेरकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे अशी माहिती युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक आणि तालुकाप्रमुख रविंद्र जोगल यांनी दिली.

देवगड उबाठा शिवसेना संपर्क कार्यालयात आयोजित पत्रकारपरिषदेत सुशांत नाईक आणि रविंद्र जोगल यांनी नवीन पदाधिकाऱ्यांची नावे जाहीर केली.यामध्ये नगरसेवक व शहरप्रमुख असलेल्या संतोष तारी यांनी भाजपात प्रवेश केल्यानंतर रिक्त असलेल्या शहरप्रमुखपदी नगरसेवक विशाल मांजरेकर यांची नियुक्ती करण्यात आली असून उपशहरप्रमुख म्हणून गणेश कांबळी व प्रफुल्ल कणेरकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.उबाठा सेनेच्या दोन नगरसेवकांनी भाजपात प्रवेश केला मात्र नगरसेवक नितीन बांदेकर, विशाल मांजरेकर, तेजस मामघाडी, मनिषा घाडी यांनी कोणत्याही त्रासाला न जुमानता हे चारही नगरसेवक उबाठा सेनेसोबत ठामपणे राहीले याबद्दल त्यांचे अभिनंदन करण्यात आले.हे चारही नगरसेवक न.पं.मध्ये विरोधी पक्ष म्हणून चांगल्याप्रकारे जबाबदारी सांभाळतील असा विश्वास यावेळी नाईक यांनी व्यक्त केला.यावेळी नुतन तालुकाप्रमुख व पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करण्यात आले.नुतन तालुकाप्रमुख रविंद्र जोगल यांनीही यावेळी पक्षाने दिलेली जबाबदारी चोखपणे पार पाडून संघटना वाढविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगीतले.दर सोमवारी पक्ष संपर्क कार्यालयात उपस्थितीत राहून लोकांचे प्रश्न सोडविणार असे सांगून यापुढे सर्व आव्हांनाना सामोरे जावू असे सांगीतले.वळीवंडे शाखाप्रमुखपदी गौरव सावंत यांची नियुक्ती केल्याचे जोगल यांनी यावेळी जाहीर केले.

You cannot copy content of this page