⚡वैभववाडी ता.१६-: बंड्या मांजरेकर मित्र मंडळ आयोजित राज्यस्तरीय भव्य बैलगाडा शर्यत नाधवडे येथील महादेव मंदिर मैदानावर मोठ्या उत्साहात संपन्न झाली. या स्पर्धेत राज्यस्तरीय गटात मंगेश मुद्रस उंबर्डे यांच्या बैलजोडीने प्रथम क्रमांक पटकावला. तर गावठी राज्यस्तरीय गटात जालिंदर गणपत कदम आरवली यांच्या बैलजोडीने प्रथम क्रमांक पटकावला.
या स्पर्धेचे बक्षीस वितरण माजी आमदार प्रमोद जठार व राज्य पणन महासंघाचे संचालक प्रमोद रावराणे यांच्या हस्ते पार पडले. यावेळी भालचंद्र साठे, जयेंद्र रावराणे, गुलाबराव चव्हाण, सज्जनकाका रावराणे, बंड्या मांजरेकर, बाळा जठार, दिलीप तळेकर, सुधीर नकाशे, मनोज रावराणे, मिलिंद मेस्त्री, दया तानवडे, बाप्पी मांजरेकर, रवी पाळेकर, तुळशीदास रावराणे, सरपंच लीना पांचाळ व पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या स्पर्धेत राज्यस्तरीय गटात प्रथम क्रमांक मंगेश मुद्रस उंबर्डे, द्वितीय क्रमांक आबासाहेब पाटील मलकापूर ससेगाव, तृतीय क्रमांक सागर यादव मलकापूर, चौथा क्रमांक गोट्या राणे कणकवली, पाचवा क्रमांक रमेश काशीराम पावसकर लांजा वसेगाव, राज्यस्तरीय गावठी बैलजोडी प्रथम क्रमांक जालिंदर गणपत कदम आरवली, द्वितीय क्रमांक प्रशांत बळीराम झोरे लांजा, तृतीय क्रमांक दिलीप शांताराम कांबळे गव्हाणे, चौथा क्रमांक दशरथ धोंडू बेळेकर नाधवडे, पाचवा क्रमांक सुनील सावंत आसरोंडी यांनी पटकावला. उत्कृष्ट बैल जोड अजय नारकर यांच्या बैल जोडीने पटकावला. तर उत्कृष्ट चालक बबन झोरे यांना जाहीर करण्यात आले.
विजेत्या बैल जोडी स्पर्धकाला 35000, द्वितीय क्रमांक 25000, तृतीय क्रमांकाला 15000, चौथ्या क्रमांकाला 12000, पाचव्या क्रमांकाला दहा हजार तसेच राज्यस्तरीय गावठी बैलजोडी स्पर्धा प्रथम क्रमांक 7000, द्वितीय क्रमांक 5000, तृतीय 3000 असे बक्षीस देऊन गौरविण्यात आले. स्पर्धा प्रसंगी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. तसेच आरोग्य यंत्रणा ही सज्ज होती. कार्यक्रम स्पर्धा यशस्वीतेसाठी बंड्या मांजरेकर मित्रपरिवार व नाधवडे ग्रामस्थ यांनी विशेष परिश्रम घेतले.
