Headlines

Global Maharashtra Breaking News

राहूल गांधी हा चेहरा भविष्यात काँग्रेससाठी आशेचा किरण ठरेल…

हर्षवर्धन सपकाळ:मंत्री नितेश राणे यांना समाजामध्ये धार्मिक तेढ निर्माण करण्यासाठी मंत्रिमंडळात ठेवले.. ⚡सावंतवाडी ता.१५-: फॅसिझम आणि भांडवलशाहीमुळे देश वेगळ्या मार्गावर चालला आहे, त्यामुळे देशाची संस्कृती,परंपरा व विचारांचे रक्षण करण्यासाठी येणाऱ्या काळात काॅग्रेस आक्रमकतेने लढणार आहे. राहूल गांधी हा चेहरा पंतप्रधान नरेंद्र मोदीपेक्षा जास्त पटलावर असून भविष्यात हाच चेहरा काँग्रेससाठी आशेचा किरण ठरेल असा विश्वास काॅग्रेसचे…

Read Full News

पाककला स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद…

भंडारी ए. सो. कनिष्ठ महाविद्यालयाच्या सुवर्णमहोत्सवानिमित्त आयोजन.. ⚡मालवण ता.१५-:भंडारी एज्युकेशन सोसायटी संचालित भंडारी ए. सो. कनिष्ठ महाविद्यालय, मालवण व माजी विद्यार्थी यांच्या संयुक्त विद्यमाने भंडारी कनिष्ठ महाविद्यालयाच्या सुवर्णमहोत्सवी वर्षा निमित्त महाविद्यालयाच्या आजी माजी विद्यार्थिनींसाठी आयोजित पाककला स्पर्धा भंडारी हॉल मालवण येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाली. या स्पर्धेत ३३ स्पर्धकांनी भाग घेतला. या स्पर्धेत स्पर्धकांनी मासे…

Read Full News

मालवण देऊळवाडा येथे उद्या तुकाराम बीज कार्यक्रम…

⚡मालवण ता.१५-:मालवण देऊळवाडा येथील श्री संत तुकाराम महाराज पादुका मंदिर येथे रविवार दि. १६ मार्च रोजी तुकाराम बीज कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. यानिमित्त सकाळी पादुका पूजन, अभिषेक, दुपारी श्री सत्यनारायण महापूजा होणार आहे. त्यानंतर स्थानिक कलाकारांचे ढोलकी भजन तसेच आनंदव्हाळ येथील बुवा बाळा सामंत यांचे संगीत भजन होणार आहे. भाविकांनी उपस्थित राहून लाभ घ्यावा,…

Read Full News

एस. पी. के च्या कॅम्पस इंटरव्यू मध्ये नऊ विद्यार्थ्यांची निवड…

⚡सावंतवाडी ता.१५-: श्री पंचम खेमराज महाविद्यालयामधील रसायनशास्त्र विभागाने युनिकेम प्रायव्हेट लिमिटेड, गोवा कंपनीतर्फे कॅम्पस इंटरव्यू चे आयोजन केले होते, यामध्ये श्री पंचम खेमराज महाविद्यालयाचे पाच विद्यार्थी तसेच एस. आर. एम. कॉलेज, कुडाळ यातील चार विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली.कंपनीच्या क्वालिटी कंट्रोल चे मॅनेजर श्री प्रशांत पेडणेकर व एच आर विभागाचे सीनियर ऑफिसर चार्ल्स मार्टिन यांनी एम…

Read Full News

वेंगुर्ले शिवसेनेच्या जागतिक महिला दिन कार्यक्रमास महिलांकडून उस्फूर्त प्रतिसाद…

⚡वेंगुर्ले ता.१५-:शिवसेनेच्या वेंगुर्ले शहर महिला संघटनेतर्फे जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून आयोजित केलेल्या महिलांसाठीच्या विविध कार्यक्रमांचे उद्घाटन शिवसेनेचे जिल्हा समन्वयक सचिन वालावलकर यांच्या हस्ते दीप प्रज्वलन झाले. याप्रसंगी उपस्थित मान्यवरात शिवसेनेचे वेंगुर्ले शहर प्रमुख उमेश येरम तालुकाप्रमुख नितीन मांजरेकर, दत्तराज नर्सरी व दत्तराज कँशू फॅक्टरीच्या संचालिका सौ. उर्मिला येरम, ओरोस येथील जिल्हा महिला बाल कल्याण…

Read Full News

भोसले इंटरनॅशनल स्कूलचे ‘रिडींग चॅलेंज’ मध्ये सुयश…

⚡सावंतवाडी ता.१५-: केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (सी.बी.एस.ई.) आयोजित ‘रिडींग चॅलेंज कॉम्पिटिशन’ मध्ये यशवंतराव भोसले इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी दैदीप्यमान यश संपादन केले. इयत्ता दहावीतील राहिनी रोशन राऊत आणि इयत्ता नववीतील विश्वजीत वैभव गायकवाड यांनी पुणे विभागात अव्वल स्थान पटकावले. विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण करणे, त्यांच्या शैक्षणिक आणि वैयक्तिक विकासासाठी आवश्यक कौशल्ये वाढवणे या उद्देशाने राज्यातील सीबीएसई…

Read Full News

अवैद्य दारू वाहतूक प्रकरणी १३ लाखाचा मुद्देमाल जप्त…

राज्य उत्पादन शुल्क इन्सुली पथकाची कारवाई: रत्नागिरीतील एक ताब्यात.. ⚡बांदा ता.१५-: अवैधरित्या मद्याची वाहतूक करताना रत्नागिरी येथील एकावर कारवाई करण्यात आली असून तब्बल 13.,25,200 रुपया किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आले आहे. ही कारवाई इन्सुली राज्य उत्पादन शुल्क पथकाकडून करण्यात आली आहे. दरम्यान ही कारवाई जुना पत्रादेवी- बांदा रोड पंजाबी धाब्याजवळ करण्यात आली आहे.

Read Full News

संदीप गावडे फाउंडेशनच्यावतीने सावंतवाडी तालुकास्तरीय मर्यादित यशवंत शिष्यवृत्ती स्पर्धा परीक्षा आयोजन…

⚡सावंतवाडी ता.१४-: संदीप गावडे फाउंडेशनच्यावतीने सावंतवाडी तालुकास्तरीय मर्यादित फक्त चौथीसाठी यशवंत शिष्यवृत्ती स्पर्धा परीक्षा २०२५ चे रविवार १६ मार्च रोजी सकाळी ११ ते दुपारी १ यावेळेत आयोजन करण्यात आले आहे.ही शिष्यवृत्ती स्पर्धा परीक्षा माडखोल केंद्रशाळा, सांगेली केंद्रशाळा,आंबोली सैनिक स्कूल, मळेवाड शाळा नं १, मळेवाड नं २, सावंतवाडी कळसुळकर हायस्कूल आणि बांदा केंद्रशाळा येथे होणार आहे.या…

Read Full News

सिंधुदुर्गातील कबड्डी संघ राष्ट्रीय खेळाडू निवड चाचणी स्पर्धेत पाठविणार…

⚡सावंतवाडी ता.१४-: राज्य कबड्डी असोसिएशनतर्फे येथे 19 ते 21 मार्चला ठाणे येथे होणाऱ्या राष्ट्रीय खेळाडू निवड चाचणी स्पर्धेसाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातून सिंधुदुर्ग जिल्हा कबड्डी असोसिएशनतर्फे पुरुष व महिलांचे संघ पाठवण्यात येणार आहेत . यासाठी आज सावंतवाडी विश्रामगृह येथे जिल्ह्यातील आठही तालुक्यातील कबड्डी खेळाडू ,पंच आयोजक यांची विशेष बैठक पार पडली. या बैठकीनंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत ठाणे…

Read Full News

श्री देव रामेश्वराच्या हुकूमानेच घडला पुन:गावराठीचा संकेत ; ३०० वर्षांनी देवहोळीचा शाहीथाट रंगला गावघर रयतेत…

⚡देवगड ता.१४-:गेल्या तीनशे वर्षांपासून काळाच्या ओघात हरवलेल्या परंपरेला नवसंजीवनी मिळाली आणि संपूर्ण मिठबाव, तांबळडेग, कातवण गावांमध्ये उत्सवाचे आनंदमय वातावरण पसरले. या तिन्ही गावांचे ग्रामदैवत श्री देव रामेश्वर यांच्या कृपेने आणि आदेशाने यावर्षी प्रथमच होळी पौर्णिमेच्या दिवशी देव होळी उत्सव भव्य स्वरूपात साजरा करण्यात आला. या अविस्मरणीय क्षणाचा साक्षीदार होण्याचा मान गावच्या गाव घर रयतेला मिळाला….

Read Full News

You cannot copy content of this page