राज्य उत्पादन शुल्क इन्सुली पथकाची कारवाई: रत्नागिरीतील एक ताब्यात..
⚡बांदा ता.१५-: अवैधरित्या मद्याची वाहतूक करताना रत्नागिरी येथील एकावर कारवाई करण्यात आली असून तब्बल 13.,25,200 रुपया किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आले आहे. ही कारवाई इन्सुली राज्य उत्पादन शुल्क पथकाकडून करण्यात आली आहे. दरम्यान ही कारवाई जुना पत्रादेवी- बांदा रोड पंजाबी धाब्याजवळ करण्यात आली आहे.
