Global Maharashtra Breaking News

प्रक्षोभक भाषण प्रकरणी आम. भास्कर जधाव यांना जामीन…

⚡कुडाळ ता.०२-: प्रक्षोभक भाषण केल्याप्रकरणी माजी मंत्री आमदार भास्कर जाधव याना ७ हजार ५०० रुपयाचा जामीन कुडाळ येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी समीरकुलकर्णी यांनी मंजूर केला. आज सोमवारी भास्कर जाधव कुडाळ न्यायालयात हजर झाले.याबाबतची हकीगत अशीअँन्टी करप्शनने आमदार वैभव नाईक यांना मालमत्ते संदर्भात चौकशी नोटीस काढल्यानंतर शिवसेना उबाठासह महाविकास आघाडीने कुडाळ येथील अँटी करप्शन कार्यालयावर १८…

Read More

देवगड अर्बन बँकेच्या व्यवसायात ६ कोटी रुपयांची वाढ-: सदाशिव ओगले…

⚡देवगड ता.०२-:सहकारी बँकींगची ८८ वर्षांची यशस्वी परंपरा जोपासणाऱ्या येथील दि देवगड अर्बन को-ऑप. बँक लि.देवगडचा एकत्रित व्यवसाय सन २०२३-२०२४ अखेर रू. ८३ कोटी १० लाख एवढा झाला असून या आर्थिक वर्षामध्ये बँकेच्या व्यवसायामध्ये रू. ६ कोटी २६ लाख अशी उल्लेखनीय वाढ झाली आहे, असे प्रतिपादन बँकेचे अध्यक्ष सदाशिव ओगले यांनी सोमवारी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत…

Read More

पाचव्या श्रावण सोमवारी देखील भाविकांची कुणकेश्वर मध्ये गर्दी…

⚡देवगड ता.०२-: श्री देव कुणकेश्वर मंदिर आज पाचव्या श्रावण सोमवारची पूजा किंजवडे येथील विनय पाडावे व पडेल येथील गणेश वेतकर यांच्या हस्ते प्रथम पूजा करण्यात आली. त्यानंतर भाविकांना दर्शन खुले करण्यात आले. पाचवा श्रावणी सोमवार असल्याने भाविकांची गर्दी ही सकाळी मोठ्या प्रमाणात होती. यावर्षी तब्बल ७१ वर्षानंतर श्रावण महिन्याची सुरुवात श्रावणी सोमवारी झाली होती आणि…

Read More

पाय घसरून पाण्यात पडलेल्या त्या युवकाचा मृतदेह सापडला…

⚡सावंतवाडी ता.०२-:देवसू येथील विमला गार्डन नजिक छोट्या ओहोळवरून पाय घसरून पाण्यात पडलेल्या फेलिक्स तेक्केकारा (वय २९, रा. नेरुळ नवी मुंबई) याचा मृतदेह माडखोल येथील तेरेखोल नदीपात्रात सापडला. आंबोली दूरक्षेत्राच्या पोलिसांनी बाबल आलमेडा रेस्क्यू टीमच्या मदतीने मृतदेह पाण्याबाहेर काढला.युवक पाण्यात पडल्याची माहिती मिळाल्यानंतर आंबोली दूरक्षेत्राचे पोलीस हवालदार दत्तात्रय देसाई, दीपक शिंदे, मनीष शिंदे यांनी लागलीच घटनास्थळी…

Read More

छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव आणि पुतळा निवडणुकीचे एटीएम म्हणून वापरले गेले…

आम. भास्कर जाधव:राजकोटची आम. भास्कर जाधव यांच्याकडून पाहणी.. मालवण (प्रतिनिधी) छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ महाराष्ट्राचा स्वाभिमान नाहीत, तर संपूर्ण जगाचा स्वाभिमान व मानबिंदू आहेत. सरकारच्या नाकर्तेपणामुळे,भ्रष्टाचारामुळे, बेजबाबदारपणामुळे शिवरायांचा पुतळा पडला. महाराजांचा पडलेला पुतळा पाहताना मनाला वेदना होतात, संताप येतो. सरकारकडून यापूर्वी राम मंदिर, काश्मीरचा प्रश्न हे निवडणुकीचे एटीएम कार्ड म्हणून वापरले गेले, त्याच प्रमाणे…

Read More

विशाल परब यांनी शिरशिंगे येथील आजारी युवकाला केली आर्थिक मदत…

⚡सावंतवाडी ता.०२-: शिरशिंगे येथील एका गरीब कुटुंबातील ४२ वर्षीय युवक किडनीच्या दुर्धर आजाराने मागील चार वर्षे त्रस्त आहे. तपासणीत त्याच्या आजाराचे निदान झाले आणि डॉक्टरांनी तातडीने किडनी ट्रान्सप्लांट करण्याचा सल्ला दिला आहे. सदर युवकाची आर्थिक परिस्थिती कमकुवत असल्याने शस्त्रक्रियेसाठी येणाऱ्या साडेसात लाख रुपयाच्या खर्चासाठी त्याच्या कुटुंबियांनी समाजातील दानशूर आणि सहृदय व्यक्तींना त्याच्यासाठी मदतीचे आवाहन केले…

Read More

गणपती सणाच्या पार्श्वभूमीवरसावंतवाडीत शांतता समितीच्या बैठक संपन्न…

सावंतवाडी दि.२ सप्टेंबर (प्रतिनिधी)गौरी गणपती सणाच्या पार्श्वभूमीवर सावंतवाडी शहरातील वाहतूक, पार्किंग व्यवस्था आणि भक्तांना बाजारहाट करण्यासाठी सुविधा निर्माण करण्यात आली आहे असे पोलिस निरीक्षक अमोल चव्हाण व नगरपालिका प्रशासकीय अधिकारी वैभवकुमार अंधारे यांनी शांतता समितीच्या बैठकीत माहिती दिली. यावेळी माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर, रिक्षा युनियनचे सरचिटणीस सुधीर पराडकर, अँड नकुल पार्सेकर, पत्रकार अभिमन्यू लोंढे, ऑगोस्तीन…

Read More

भोसले इंटरनॅशनल स्कूलमध्ये विद्यार्थी पदग्रहण सोहळा उत्साहात…

⚡सावंतवाडी ता.०३-: यशवंतराव भोसले इंटरनॅशनल स्कूलमध्ये विद्यार्थी पदग्रहण सोहळा आज मोठ्या दिमाखात संपन्न झाला. विद्यार्थ्यांच्या अंगी नेतृत्व कौशल्य यावे तसेच शालेय विकासात योगदान देणाऱ्या जबाबदाऱ्या योग्य प्रकारे सांभाळता याव्यात यासाठी ‘स्टूडेंट कौन्सिल’ निवडून त्यांना पदभार सोपवण्यात आला. यामध्ये प्रामुख्याने हेड बॉय, हेड गर्ल, स्पोर्टस कॅप्टन, कल्चरल सेक्रेटरी, हाऊस कॅप्टन आदी पदांसाठी विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली….

Read More

जिल्ह्यात स्वच्छ माझे अंगण अभियानाला प्रारंभ…

जिल्ह्यातील सर्व कुटुंबांनी सहभाग घ्यावा:मुख्य कार्यकारी अधिकारी मकरंद देशमुख यांचे आवाहन.. ओरोस ता २जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात “स्वच्छ माझे अंगण अभियान” 1 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर 2024 दरम्यान राबवण्यात येणार आहे. यामध्ये जिल्ह्यातील सर्व कुटुंबांनी सहभाग घ्यावा, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी मकरंद देशमुख यांनी केले आहे.शोषखड्डा, परसबाग, पाझरखड्डा, घनकचरा व्यवस्थापन करीता कंपोस्ट खत खड्डा…

Read More

गणेश चतुर्थी काळात आम्हाला बाजारपेठेत बाहेर बसायला मुभा द्या…

भाजी विक्रेत्यांची संजू परब यांच्याकडे मागणी:तर चार तारिख पासून बसण्यास मिळणार मुभा दिले आश्वासन.. ⚡सावंतवाडी ता.०३-: गणेश चतुर्थी काळात आम्हाला बाजारपेठेत बाहेर बसायला मुभा द्या अशी मागणी बाजारपेठेतील महिला पुरुष भाजी विक्रेत्यांनी माजी नगराध्यक्ष तथा भाजपा जिल्हा उपाध्यक्ष संजू परब यांच्याजवळ केली. संबधित व्यापाऱ्यांनी आज श्री परब यांची त्यांच्या संपर्क कार्यालयात भेट घेत याबाबत विनवणी…

Read More
You cannot copy content of this page