दत्तात्रय हिर्लेकरांच्या ‘कर्तव्यपूर्ती’ आत्मचरित्रास राज्यस्तरीय पुरस्कार…

पालघर येथील साहित्य संमेलनात पुरस्कार प्राप्त..

कणकवली : कलमठ येथील दत्तात्रय शिवराम हिर्लेकर (गुरुजी) ‘कर्तव्यपूर्ती’ आत्मचरित्र यांच्या या पुस्तकाला तीन राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त झाले आहेत.

साहित्यकला विचारमंच आणि उचाट शिक्षण संस्था, उचाट, जिल्हा पालघर आयोजित राज्यस्तरीय मराठी साहित्य संमेलन २०२५ मध्ये राज्यस्तरीय अक्षरसाधना पुरस्कार (चरित्र) प्राप्त झाला आहे.

तसेच अखिल भारतीय स्वाभिमानी संघर्ष सेना व पि.धो. सामाजिक संस्था आयोजित राज्यस्तरीय पुरस्कार सोहळा २०२४-२०२५ मध्ये राज्यस्तरीय स्वाभिमानी साहित्य सेवा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे. तर पलपब प्रकाशन संस्था, अहमदाबाद यांच्यावतीने २०२५चा आत्मचरित्र प्रकारातील राज्यस्तरीय साहित्य पलपब भूषण पुरस्कार हा “कर्तव्यपूर्ती” आत्मचरित्र पुस्तकास देऊन सन्मानित करण्यात आले.

या आत्मचरित्रास राज्यस्तरीय पुरस्कारांनी गौरविण्यात आल्याने हा आपल्या आयुष्यातील परमोच्च आनंदाचा क्षण आहे, अशी प्रतिक्रिया हिर्लेकर (गुरुजी) यांनी दिली आहे.

You cannot copy content of this page