Global Maharashtra Breaking News

अर्चना घारे परब यांच्या जाणीव जागर यात्रेस उत्स्फूर्त प्रतिसाद…

⚡सावंतवाडी ता.२८-: राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या माध्यमातून जाणीव जागर यात्रेच्या* तिसऱ्या टप्प्याला आज सावंतवाडी तालुक्यात सुरूवात झाली आहे. कोकण विभाग महिला अध्यक्षा सौ अर्चना घारे-परब यांच्या उपस्थितीत होणाऱ्या या यात्रेला लोकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. डोंगरपाल, नेतर्डे गावांमध्ये सौ. घारे यांनी आपल्या मूलभूत हक्कांची जाणीव करून दिली. महिला, युवक, ज्येष्ठ नागरिक यांच्या हक्कांचा जागर…

Read More

गांधीनगरच्या नुतन पोलीस पाटील मिताली शेटये यांचा गौरव…

वेंगुर्ला प्रतिनिधी- शिरोडा-गांधीनगर भागांस शासनाकडून प्रथमच महिला पोलीस पाटील मिताली मकरंद शेटये यांना याच भागातील नियुक्त केल्याने शिरोडा-गांधीनगर परीसरातील नागरीकांत समाधान व्यक्त होत आहे.या नुतन पोलीस पाटील मिताली शेटये यांचा सामाजिक कार्यकर्ते तथा वेंगुर्ला तालुका रास्त धान्यदुकान संघटनेचे अध्यक्ष तात्या हाडये यांनी पुष्पगुच्छ देवून अभिनंदन केले. शासनाकडून पोलीस पाटील शिरोडा-गांधीनगर भागास दिल्याने या भागातील व…

Read More

विद्यानिकेतन स्कूलची जिल्हास्तरावर निवड…!

वेंगुर्ला प्रतिनिधी- क्रीडा आणि युवक सेवा संचालनालय जिल्हा क्रीडा कार्यालय सिंधुदुर्ग यांच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या वेंगुर्ला तालुकास्तरीय क्रिकेट स्पर्धेत १७ वर्षाखालील मुले या गटातून सिंधुदूर्ग विद्यानिकेतन इंग्लिश मिडीयम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी विजेतेपद पटकावले. त्यांची मालवण येथे होणा-या जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.त्यांच्या या यशाबद्दल संस्थेचे उपाध्यक्ष इर्शाद शेख, संचालक प्रशांत नेरूरकर, सचिव दत्तात्रय परूळेकर, मुख्याध्यापिका सौ.मनीषा…

Read More

शालेय फुटबॉल स्पर्धेत विभाग स्तरावर सिंधुदुर्ग सैनिक स्कूल अँड ज्युनियर कॉलेजचे दैदीप्यमान यश…

⚡आंबोली ता.२८-:क्रिडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे आणि क्रिडा उपसंचलनालय,कोल्हापूर विभाग यांच्यावतीने आयोजित विभागीय शालेय फुटबॉल स्पर्धेत विभाग स्तरावर सिंधुदुर्ग सैनिक स्कूल अँड ज्युनियर कॉलेज संघाने तृतीय क्रमांक पटकवत दैदीप्यमान यश संपादन केले. डेरवण क्रिडा संकुल, चिपळूण येथे दिनांक २७\०९\२०२४ रोजी आयोजित विभाग स्तरावरील शालेय फुटबॉल स्पर्धेत सतरा वर्षाखालील वयोगटात सातारा जिल्ह्यातील सैनिक…

Read More

बांद्यात ५ व ६ ऑक्टोबर रोजी भव्य खुल्या दांडिया स्पर्धेचे आयोजन…!

बांदा सार्वजनिक नवरात्रोत्सव गांधीचौक मित्रमंडळ तर्फे आयोजन: स्पर्धकांनी संघांची नावनोंदणी करण्याचे केले आवाहन.. ⚡बांदा ता.२८-: सार्वजनिक नवरात्रोत्सव गांधीचौक मित्रमंडळ बांदा यांच्या वतीने ५ व ६ ऑक्टोबर रोजी भव्य खुल्या दांडिया स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.ही स्पर्धा श्री स्वामी समर्थ सॉ मिलचे आनंद गवस यांनी पुरस्कृत केली आहे. स्पर्धेतील प्रथम तीन क्रमांक विजेत्या दांडिया संघाना अनुक्रमे…

Read More

नवांगुळ यांच्या मल्टीस्पेशालिटी हाॅस्पिटलला मंजूरी द्या…

अमोल टेंबकर;महात्मा फुले आरोग्य योजनेतून होणार गोरगरीबांना होणार फायदा सावंतवाडी : सावंतवाडी विधानसभा मतदारसंघ एकाही खासगी रूग्णालयात महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजना लागू नाही. डॉ. राजेश नवांगुळ यांनी आपल्या मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलसाठी ती लागू करावी अशी मागणी केली होती. त्यासाठी आवश्यक ऑडीट देखील झालेली असून मंजूरी मात्र मिळालेली नाही. सात वर्षांनी पुन्हा एकदा या योजनेसाठी अर्ज…

Read More

दिघे साहेब असते तर गोळ्या घालून मारले असते‌…

बबन साळगावकर: केसरकरांनी २००७ ला २५ कोटीचा आंबोलीत उभारलेला प्रकल्प बंद.. सावंतवाडी : धर्मवीर -२ या सिनेमेचा पहिलाच शो बघितला. हा सिनेमा म्हणजे बोगसपणा आहे. स्व. आनंद दिघे साहेबांनी गद्दारी करायला लावली असं त्यातून दाखवलं गेलं आहे. शो बघून मनाला प्रचंड वेदना झाल्या. स्व. दिघे साहेब असते तर अक्षरशः गोळ्या घालून या लोकांना मारले असते‌…

Read More

मुंबईत दीपक केसरकरांना उमेदवारी द्या…

राजन तेली:पंधरा वर्षात दीपक केसरकर यांनी काय केलं ? ५० लोकांना रोजगार देणारा एखादा प्रकल्प आणला का..? सावंतवाडी : पक्षाच्या वरिष्ठांची भेट घेत भाजपचा उमेदवार सावंतवाडीतून‌ द्यावा अशी मागणी करणार आहे. माझी पार्टी इथल्या रिपोर्टचा अभ्यास करेल, सीट पडणार असेल तर सर्वेनुसार विचार करेल. इथले आमदार आजवर फसवणूक करत आल्याने आपली सिट पडणार नाही याची…

Read More

जय मल्हार मित्रमंडळ असलदे धनगरवाडी यांच्यावतीने तंटामुक्त अध्यक्ष रुपेश खरात यांचा सत्कार…!

कणकवली : जय मल्हार मित्रमंडळ असलदे धनगरवाडी यांच्यावतीने तंटामुक्त अध्यक्ष रुपेश खरात यांचा शाल , श्रीफळ , पुच्छपगुच्छ देवून सत्कार करण्यात आला. यावेळी असलदे गावातील निर्माण होणारे तंटे सामोपचाराने मिटवण्यासाठी ही समिती काम करणार आहे. शासनाच्या धोरणानुसार शांतता प्रस्तापित करण्याच्या दृष्टीने गावाचे सरपंच चंद्रकांत डामरे व सोसायटी चेअरमन भगवान लोके यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व समितीला विश्वासात…

Read More

२१ दिवसांच्या गणरायाला मोठ्या भक्तीभावानं निरोप…!

⚡सावंतवाडी ता.२९-: २१ दिवसांच्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या गणरायाला मोठ्या भक्तीभावानं वाजत गाजत निरोप देण्यात आला. वारकरी पेहराव, पारंपरिक वाद्य, ढोलताशांचा नाद, मर्दानी खेळ, सामाजिक संदेश देणारे कार्यक्रम व आकर्षक देखावे विसर्जन मिरवणूकीत लक्षवेधी ठरले. शेकडो नागरिकांनी हा विसर्जन सोहळा अनुभवण्यासाठी गर्दी केली होती. ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’ असा जयघोष व फटाक्यांच्या आतषबाजीने…

Read More
You cannot copy content of this page