देवली भिमनगरवाडी येथील अनेक ग्रामस्थांचा शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश…

मालवण दि प्रतिनिधी
विकासाचे व्हिजन असलेले आमदार निलेश राणे यांच्या गतिशील विकास कार्यावर प्रेरित होऊन तसेच ‘देऊ तो शब्द पुर्ण करू’ या शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या कार्यशैलीला प्रेरित होऊन मालवण कुडाळ मतदारसंघात शिवसेनेत पक्ष प्रवेशाचा धडाका सुरु आहे. देवली भिमनगरवाडी येथील अनेक ग्रामस्थांनी शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या उपस्थित सोमवारी शिवसेनेत प्रवेश केला.

अनेक वर्षांपासून वाडीत असलेली पिण्याच्या पाण्याची समस्या कायमस्वरूपी मार्गी लावण्यासाठी दत्ता सामंत यांनी दिलेल्या शब्दाप्रमाणे काम सुरु केले. तसेच वाडीला जोडणारा रस्ताही करण्यात येत आहे. ग्रामस्थांच्या मागणीची तात्काळ दखल घेणारे आमदार निलेश राणे, शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून शिवसेनेत प्रवेश करतं असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.

यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख राजा गावडे, देवली उपसरपंच हेमंत चव्हाण, माजी सरपंच विजय चव्हाण, रामू चव्हाण, मेघा पाटकर, मंदार लुडबे यांसह अन्य शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी देवली भिमनगरवाडी येथील अनेक ग्रामस्थांनी शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी माजी सरपंच दिलीप देऊलकर, प्रभाकर देऊलकर, रघुनाथ देऊलकर, विजय देऊलकर, प्रदीप देऊलकर, जितेंद्र देऊलकर, महादेव देऊलकर, रवींद्र देऊलकर, प्रदीप देऊलकर, प्रसन्न देऊलकर, तेजस देऊलकर, सुनील देऊलकर, यशवंत देऊलकर, विनायक देऊलकर, सचिन देऊलकर, योगेश देऊलकर यांसह अनेक ग्रामस्थांनी शिवसेनेत प्रवेश केला.

You cannot copy content of this page