Headlines

पाट हायस्कूलच्या कलाकारांचे निवती पोलीस स्टेशन कडून कौतुक…

‘नशामुक्ती वॉल’ ठरली लक्षणीय.. ⚡कुडाळ ता.२९-: अंमली पदार्थ विरोधी दिनाच्या निमित्ताने पाट हायस्कुलने चित्रकला स्पर्धेचे आयोजन केले होते. या स्पर्धेत सहभागी होऊन बक्षिसे मिळविलेल्या हायस्कुलच्या मुलांचे निवती पोलीस ठाण्याच्या वतीने कौतुक करण्यात आले. या चित्रांचे ‘नशामुक्ती’ वॉल या नावाने पोलीस ठाण्यात भरविण्यात आलेले प्रदर्शन लक्षणीय ठरले.अमली पदार्थ मोहीम राबविताना पाट हायस्कूलमध्ये चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात…

Read Full News

पाट हायस्कूलला “वाॅटर फिल्टर प्रदान…

सांस्कृतिक कला व शिक्षण विकास समितीचा पुढाकार.. ⚡कुडाळ ता.२९-: राजर्षी शाहू महाराज जयंती व महाकवी कालिदास दिनाचे औचित्य साधून एस् .के .पाटील शिक्षण प्रसारक मंडळ पाट पंचक्रोशी ,पाट संचलित एस्. एल्. देसाई विद्यालय तथा कै. डॉ.विलासराव देसाई कला, वाणिज्य, विज्ञान महाविद्यालय व कै. राधाबाई सामंत इंग्लिश मीडियम स्कूलला सावंतवाडी येथील सांस्कृतिक कला शिक्षण विकास समितीतर्फे…

Read Full News

बांदा केंद्र शाळेत रेबीज रोगाबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन…

⚡बांदा ता.२९-: गंभीर अशा संसर्गजन्य समजल्या जाणाऱ्या रेबीज रोगाबाबत पीए श्री बांदा नं.१केंद्रशाळेत शाळा व्यवस्थापन समिती व वर्ल्डवाईड वेटेरीनरी सर्हीस यांच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन वर्गाचे आयोजन करण्यात आले होते. शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष रत्नाकर आगलावे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या या मार्गदर्शन वर्गात रेबीज मिशन बाबत अमित नाईक व वसंत तावडे यांनी विद्यार्थ्यांना पाळीव प्राण्यांची काळजी…

Read Full News

कोकणात शिंदेंची शिवसेनाच नंबर वन !

निवडणुकीत 70 टक्के जागांवर दावा:शिवसेनेच्या पक्ष मेळाव्यातील सूर.. ⚡कुडाळ ता.२८-: कोकणात शिंदेंची शिवसेनाच एक नंबरला असल्याचा सूर आजच्या शिवसेनेच्या मेळाव्यात शिवसेनेच्या दोन मंत्री आणि दोन आमदारांकडून ऐकायला मिळाला. मंत्री उदय सामंत यांनी तर दोन आमदारांसह जिल्ह्यात शिवसेना एक नंबर असल्याने आगामी निवडणुकीत 70 टक्के जागांवर आपला दावा आहे. त्यामुळे महायुतीत कमीतकमी तेवढ्या जागा मिळाल्या पाहिजेत…

Read Full News

सरकारच्या जनकल्याणकारी योजना तळागळातील जनतेपर्यत पोहचवा…

आमदार निलेश राणे:मालवण पंचायत समिती महा आवास अभियान तालुकास्तरीय पुरस्कारांचे वितरण ⚡मालवण ता.२८-:पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील केंद्रसरकार आणि राज्यातील महायुती सरकार हे सर्वासामान्य जनतेचे सरकार आहे. विकासनिधी सोबत हजारो कोटी निधी जनकल्याणकारी योजनांसाठी मंजूर होत आहे. या योजना तळागळातील जनतेपर्यत पोहचत असताना कोणीही पात्र लाभार्थी वंचित राहता नये. याकडे अधिकारी आणि लोकप्रतिनिधी यांचे लक्ष…

Read Full News

बॅचलर ऑफ आर्किटेक्चर परीक्षेत गौरव सावंत चे यश…!

⚡कणकवली ता.२८-:तालुक्यातील वागले आर्यादुर्ग सोसायटी येथील गौरव गीता गणेश सावंत याने बॅचलर ऑफ आर्किटेक्चर ही पदवी सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी च्या माध्यमातून प्राप्त करत उज्वल यश संपादन केले आहे. त्याच्या या यशाबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे.सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी सिंहगड येथील कॉलेजमध्ये गौरव यांनी आर्किटेक्चर ची परीक्षा दिली. या परीक्षेत तो विशेष प्राविण्यासह प्रथम श्रेणी…

Read Full News

बांदा श्री विठ्ठल मंदिरात वीणा सप्ताहास आरंभ…!

⚡बांदा ता.२८-:बांदा येथिल श्री विठ्ठल मंदिरात प्रतिवर्षावप्रमाणे यंदाही हरिनाम वीणा सप्ताहाला शनिवारी मोठ्या उत्साहात व भक्तीमय वातावरणात आरंभ झाला.सप्ताहाचे पारप्रमुख,सेवेकरी व भाविकांच्या उपस्थितीत या सोहळ्याची सुरुवात झाली. सर्वप्रथम वीणा,समई व तबला,पेटी,टाऴ आदी सर्व भजन साहित्य श्री विठ्ठल रखुमाई चरणी ठेवण्यात आले. त्यानंतर ज्येष्ठ भजनकर्मी गिरिकाका महाजन आणि वीणा सप्ताह नियोजनप्रमुख प्रकाश उर्फ भाऊ मिशाळ यांच्या…

Read Full News

सिंधुदुर्गात प्रथमच मोफत लेसरद्वारे व्हेरिकोज व्हेन्स उपचार शिबीर…

सावंतवाडी : अथायु हॉस्पिटल कोल्हापूर, श्रीराम हॉस्पिटल कुडाळ व संजीवनी हॉस्पिटल, कणकवली यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवार ४ ते शनिवार दिनांक ५ जुलै रोजी सकाळी ११ ते २ या वेळेत अनुक्रमे कुडाळ व कणकवली येते मोफत लेसरद्वारे व्हेरिकोज व्हेन्स उपचार शिबीर आयोजीत करण्यात आले आहे. या व्हेरिकोज व्हेन्स लक्षणेमध्ये पाय सुजणे,संध्याकाळी पाय दुखणे,पायामध्ये असहजता निर्माण होणे,…

Read Full News

‘मदर क्वीन्स’च्या विद्यार्थ्यांनी अनुभवला रंगांचा कलाविष्कार…

⚡सावंतवाडी ता.२८-: सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळ संचलित मदर क्वीन्स इंग्लिश स्कूल सावंतवाडीमध्ये शनिवारी ‘अम्ब्रेला पेंटिंग’ ऍक्टिव्हिटी आयोजित करण्यात आली. या कार्यक्रमाचे उद्घाटन दीप प्रज्वलनाने व मान्यवरांच्या स्वागताने झाले. या उपक्रमामध्ये इयत्ता पाचवी ते नववीची मुले सहभागी झाली होती. फॅब्रिक कलर्सचा वापर करून प्लेन छत्रीवर कॅलिग्राफी आर्ट आकर्षक पद्धतीने साकारण्यात आली. यात पावसाची बडबड गीते,…

Read Full News

स्मिता नाईक यांच्या ‘ दिपज्योती नमोस्तुते ‘ पुस्तकाचे उद्या प्रकाशन…

⚡सावंतवाडी ता.२८-: तळवडे केंद्रप्रमुख सौ.स्मिता रविंद्र नाईक यांच्या ‘ दिपज्योती नमोस्तुते ‘ या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा रविवार २९ जून रोजी सकाळी १० वाजता पोपकर हॅाल भटवाडी माजगाव सावंतवाडी येथे होणार आहे. या पुस्तकामध्ये सौ.नाईक यांनी आपले ३८ वर्षाच्या शैक्षणिक क्षेत्रातील अनुभव व या शिक्षण सेवेच्या कालावधीत आपणाला आयुष्यात काय मिळाले आणि आपण काय गमावले ?…

Read Full News

You cannot copy content of this page