पाट हायस्कूलला “वाॅटर फिल्टर प्रदान…

सांस्कृतिक कला व शिक्षण विकास समितीचा पुढाकार..

⚡कुडाळ ता.२९-: राजर्षी शाहू महाराज जयंती व महाकवी कालिदास दिनाचे औचित्य साधून एस् .के .पाटील शिक्षण प्रसारक मंडळ पाट पंचक्रोशी ,पाट संचलित एस्. एल्. देसाई विद्यालय तथा कै. डॉ.विलासराव देसाई कला, वाणिज्य, विज्ञान महाविद्यालय व कै. राधाबाई सामंत इंग्लिश मीडियम स्कूलला सावंतवाडी येथील सांस्कृतिक कला शिक्षण विकास समितीतर्फे वॉटर प्रदान करण्यात आला.
संस्था कार्यवाह विजय ठाकूर व निवती पोलीस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक भीमसेन गायकवाड यांच्या प्रमुख उपस्थितीत व समीर शिर्के यांच्या हस्ते प्रशालेच्या मुख्याध्यापकांनी हा वॉटर फिल्टर स्वीकारला. जेव्हा जेव्हा आमच्या समितीला काम करण्याची संधी मिळेल तेव्हा तेव्हा आम्ही पाट हायस्कूलला आणखीन मदत करू असे आश्वासन समीर शिर्के यांनी आपल्या भाषणात दिले. हे सर्व प्रशालेतील कलाशिक्षक संदीप साळसकर यांनी वेळोवेळी केलेल्या सहकार्यामुळे शक्य झाले असेही ते आपल्या मनोगतात सांगितले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रशालेचे मुख्याध्यापक राजन हंजनकर, सूत्रसंचालन संदीप साळसकर व आभार प्रदर्शन पर्यवेक्षक सयाजी बोंदर यांनी केले. या कार्यक्रमासाठी संस्था पदाधिकारी व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

You cannot copy content of this page