आमदार निलेश राणे:मालवण पंचायत समिती महा आवास अभियान तालुकास्तरीय पुरस्कारांचे वितरण
⚡मालवण ता.२८-:
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील केंद्रसरकार आणि राज्यातील महायुती सरकार हे सर्वासामान्य जनतेचे सरकार आहे. विकासनिधी सोबत हजारो कोटी निधी जनकल्याणकारी योजनांसाठी मंजूर होत आहे. या योजना तळागळातील जनतेपर्यत पोहचत असताना कोणीही पात्र लाभार्थी वंचित राहता नये. याकडे अधिकारी आणि लोकप्रतिनिधी यांचे लक्ष असलेच पाहिजे. यासोबत विकासकामे व जनकल्याणकारी योजनेसाठी अधिकाधिक मागणी प्रस्ताव आले पाहिजेत. महायुती सरकारच्या माध्यमातून अधिकाधिक विकासनिधी खेचून आणण्यासाठी आम्ही कटीबद्ध राहू. असे प्रतिपादन मालवणचे आमदार निलेश राणे यांनी पोईप येथे बोलताना केले.
ग्राम विकास व पंचायत राज विभाग राज्य व्यवस्थापन कक्ष – ग्रामीण गृहनिर्माण जिल्हा परिद निधुदुर्ग, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, सिंधुदुर्ग मालवण पंचायत समिती प्रधानमंत्री आवास योजना पंचायत समिती मालवण प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण व राज्य पुरस्कृत ग्रामीण आवास योजना अंतर्गत महा आवास अभियान मालवण तालुकास्तरीय पुरस्कार वितरण सोहळा आमदार निलेश राणे यांच्या अध्यक्षतेखाली पोईप सर्कल एज्युकेशन सोसायटी संचालित श्री. सिद्धिविनायक सभागृह येथे कार्यक्रम संपन्न झाला.
यावेळी गटविकास अधिकारी शाम चव्हाण, शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, जिल्हा सरचिटणीस दादा साईल, जिप माजी वित्त व बांधकाम सभापती अनिल कांदळकर, संतोष साटविलकर, सरपंच श्रीधर नाईक, माजी सभापती राजू प्रभुदेसाई, शिवसेना तालुकाप्रमुख राजा गावडे, शहर प्रमुख दीपक पाटकर, पंकज वर्दम यांसह अधिकारी, ग्रामसेवक, सरपंच, उपसरपंच, पात्र लाभार्थी उपस्थित होते. प्रारंभी गटविकास अधिकारी शाम चव्हाण यांनी प्रास्ताविक केले
यावेळी आमदार निलेश राणे यांनी मतदारसंघात रोजगार निर्मितीला प्राधान्य दिले जात आहे. पोईप धरण क्षेत्राचा सर्व्हे केला जाईल. धरणात पाणी साठत नसेल. ते फेल असेल तर त्याठिकाणी काही करता येईल रोजगार निर्मिती करता येईल का? याला प्राधान्य दिले जाईल असे सांगून ते पुढे म्हणाले, मालवण पंचायत समिती माध्यमातून जनतेला 24 तास सेवा मिळाली पाहिजे. हेल्पलाईन तयार करा. सेवा सुविधा या माध्यमातून मालवण अग्रक्रमावर राहिले पाहिजे. यासाठी अधिकारी लोकप्रतिनिधी यांनी सर्वोत्तम योगदान द्या. आवश्यक सर्व सहकार्य करण्यासाठी कटीबद्ध आहे. असेही आमदार राणे म्हणाले .
यावेळी दत्ता म्हणाले, आमदार निलेश राणे यांच्या माध्यमातून कोट्यावधी निधी आला. याठिकाणी पोईप हायस्कुल ला 35 लाख निधी खासदार नारायण राणे, आमदार निलेश राणे यांच्या माध्यमातून मंजूर झाला. लवकरच सर्व शाळेत वह्या वाटप आमदार निलेश राणे यांच्या माध्यमातून केले जाईल. पुढील वर्षी गरजू मुलांना सायकल वाटप करणार असे शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी सांगितले.
यावेळी माजी वित्त व बांधकाम सभापती अनिल कांदळकर यांनीही विचार मांडले.यावेळी आधुनिक तंत्रज्ञान, नियोजनबद्ध व्यवस्थापन करुन आंबा उत्पादनामध्ये नवा विक्रम प्रस्थापित करत जागतिक स्तरावर हापूस आंब्याची प्रथम पेटी पाठविण्याचा वर्ल्ड रेकॉर्ड केलेले उपक्रमशील शेतकरी डॉ. उत्तम सूर्यकांत फोंडेकर यांनाही सन्मानपत्र देण्यात आले.तसेच गट शिक्षणाधिकारी संजय माने व गटविकास अधिकारी शाम चव्हाण यांचा सत्कार करण्यात आला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चंद्रसेन पाताडे यांनी केले.