Headlines

राज्याचे विधान परिषद सभापती राम शिंदे सिंधुदुर्ग दौऱ्यावर…

कणकवलीत केले शिवसेना कार्यकर्त्यांनी स्वागत:नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी देखील घेतली भेट.. ⚡कणकवली ता.०६-: महाराष्ट्र राज्याचे विधान परिषद सभापती राम शिंदे आज सिंधुदुर्ग दौऱ्यावर आहेत. त्यानिमित कणकवली रेल्वे स्टेशनवर विधान परिषद सभापती राम शिंदे यांचे आगमन होताच शिंदे शिवसेनेच्या वतीने माजी आमदार राजन तेली यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी शिंदे शिवसेनेचे विधानसभा प्रमुख संदेश पटेल,…

Read Full News

विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे सिंधुदुर्ग दौऱ्यावर; माजी आमदार राजन तेली यांच्याकडून स्वागत…

⚡कणकवली ता.०५-: महाराष्ट्र विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे हे आज सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले आहेत. त्यांच्या या दौऱ्यानिमित्त माजी आमदार राजन तेली यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले. जिल्ह्यात आयोजित करण्यात आलेल्या विविध कार्यक्रमांसाठी प्रा. शिंदे आज सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर आहेत.

Read Full News

निरवडेच्या वासुदेव वैजची ‘वैभववाडी श्री’ किताबावर मोहोर; सिंधुदुर्गातून कौतुकाचा वर्षाव…

⚡​सावंतवाडी, ता. ०५-:महाराष्ट्र बॉडी बिल्डर्स व सिंधुदुर्ग बॉडी बिल्डर्स असोसिएशन यांच्या मान्यतेने, वैभववाडी येथील यंग स्टार मित्र मंडळाच्या वतीने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नामवंत खेळाडूंसाठी भव्य जिल्हास्तरीय शरीरसौष्ठव स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या चुरशीच्या स्पर्धेत निरवडे येथील वासुदेव वैज याने आपल्या पीळदार शरीरयष्टीच्या जोरावर ‘वैभववाडी श्री’ या किताबावर आपले नाव कोरत स्पर्धेचा मुख्य मानकरी ठरला.​ही स्पर्धा…

Read Full News

पालकरवाडी वेतोरे ग्रा.पं. उपसरपंचपदी भाजपच्या शुभदा गोसावी यांची बिनविरोध निवड

⚡वेंगुर्ला ता.०५-: तालुक्यातील पालकरवाडी वेतोरे ग्रामपंचायत उपसरपंचपदी भाजपच्या शुभदा समिर गोसावी यांची बिनविरोध निवड करण्यात आली. आज सोमवारी दि. 5 जानेवारी रोजी दुपारी ग्रामपंचायत सभागृहात सरपंच सदाशिव उर्फ बंड्या पाटील व अध्यासी अधिकारी व्ही. जी. सावंत यांच्या उपस्थितीत ही निवड प्रक्रिया पार पडली.उपसरपंच नंदिता शेर्लेकर यांनी 24 डिसेंबर रोजी राजीनामा दिल्यानंतर आज रिक्त जागेसाठी ही…

Read Full News

तरुणांनो तुम्ही कुटुंबियांचे भवितव्य आहात…

सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस अधीक्षक मोहन दहिकर यांचे वेंगुर्ला येथे प्रतिपादन.. ⚡वेंगुर्ला ता.०५-: गेल्या वर्षभरात सिंधुदुर्ग जिल्ह्यात रस्ते अपघातात 68 जीव आपण गमावले असून यामध्ये 45 मध्यमवर्गीय दुचाकीस्वार आहेत, ही बाब चिंताजनक आहे. तरुण युवक हे कुटुंबाचे आधारस्तंभ आहेत. त्यामुळे रस्ता सुरक्षा ही महत्वाची असून वाहनावर मोबाईलचा वापर न करता हेल्मेट, सीटबेल्ट यांचा वापर करा. रस्ता…

Read Full News

कणकवली हुंबरठ येथे दुचाकी जळून खाक…

⚡कणकवली ता.०५-: कोल्हापूरहून सावंतवाडीच्या दिशेने जात असलेल्या दुचाकीला हुंबरठ ब्रिजवर अचानक आग लागली. यात दुचाकी वरील कपडे जळून सुमारे एक लाख नऊ हजार पाचशे रुपयांचे नुकसान झाले आहे. याबाबतचे खबर कापड व्यावसायिक विक्रांत सुरेश चव्हाण राहणार कोल्हापूर राजारामपुरी यांनी कणकवली पोलीस ठाण्यात दिली आहे. ही घटना सोमवारी दुपारी 1:30 वाजण्याच्या सुमारास घडली. विक्रांत चव्हाण यांचे…

Read Full News

अतिक्रमण नोटिसांनी मच्छी विक्रेत्या महिलांमध्ये संताप…

भाजप नगरसेविकांच्या नेतृत्वाखाली नगरपालिका धडक.. मालवण दि प्रतिनिधी मालवण मच्छी मार्केट मधील महिलांना चार दिवसापूर्वी नगरपालिका प्रशासनाने अतिक्रमण हटविण्याच्या नोटीसा बजावत कारवाई करण्याचा इशारा दिल्यानंतर मालवण मधील मत्स्य विक्रेत्या महिलांनी नाराजी व्यक्त करीत आज भाजपच्या नगरसेविका सौ. अन्वेषा आचरेकर यांच्या नेतृत्वाखाली नगरपालिकेत धडक दिली. यावेळी मुख्याधिकारी अनुपस्थित असल्याने सौ. आचरेकर यांच्या समवेत मच्छी विक्रेत्या महिलांनी…

Read Full News

कलमठ पिंपळपार येथे उच्चदाब विद्युत वाहिन्यांचा जीवघेणा धोका – महावितरणचा निष्काळजी पणा..

प्रांताधिकाऱ्यांकडे ठोस कार्यवाहीची मागणी:ग्रामपंचायत सदस्य धीरज मेस्त्री यांनी 26 जानेवारी रोजी उपोषणाचा दिला इशारा.. ⚡कणकवली ता.०५-: कलमठ सुतारवाडी पिंपळपार येथील ग्रामपंचायत सभामंडपाच्या थेट छतावरून जाणाऱ्या उच्चदाब विद्युत वाहिन्या आजही तशाच धोकादायक अवस्थेत असून, शेकडो ग्रामस्थांच्या जीवाशी उघडपणे खेळ सुरू असल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. या गंभीर बाबीकडे महावितरण व प्रशासनाकडून जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असल्याचा…

Read Full News

देवानंद खवणेकर यांची शिंदे शिवसेना उपजिल्हा संघटकपदी निवड…

⚡सावंतवाडी ता.०५-:शिंदे शिवसेना सावंतवाडी मतदारसंघाच्या उपजिल्हा संघटकपदी देवानंद काशिनाथ खवणेकर यांची निवड आज जाहीर करण्यात आली. याबाबतचे अधिकृत नियुक्तीपत्र शिंदे शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब यांच्या हस्ते त्यांना प्रदान करण्यात आले. या निवडीबद्दल उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून देवानंद खवणेकर यांचे अभिनंदन करण्यात आले असून, त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला. पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी आणि तळागाळातील कार्यकर्त्यांना…

Read Full News

तारामुंबरी वासियांकरिता स्वतंत्र लघु नळयोजना राबविण्याची मागणी…

सामाजिक कार्यकर्ते धनंजय जोशी यांनी दिले मुख्याधिकारी, नगराध्यक्षा यांना निवेदन.. ⚡देवगड ता.०५-:देवगड–जामसंडे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या दहिबाव येथील अत्यंत महत्त्वाच्या नळयोजनेची पाईप लाईन सध्या जीर्ण झाली असून ती वारंवार फुटत आहे. अनियमित होणाऱ्या पाणीपुरवठ्यामुळे संपूर्ण देवगड शहरातील नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. विशेषतः पहिला मजला आणि उंच भागातील नागरिकांपर्यंत पाणी पोहोचण्यात मोठ्या अडचणी निर्माण होत…

Read Full News

You cannot copy content of this page