सेवा शक्ती संघर्ष एसटी कर्मचारी संघ कणकवली आगार कार्यकारिणी जाहीर…

⚡कणकवली ता.२८-: सेवा शक्ती संघर्ष एसटी कर्मचारी संघाच्या कणकवली आगाराची २०२६ साठीची कार्यकारिणी नुकत्याच झालेल्या बैठकीत जाहीर करण्यात आली. अध्यक्षपदी वैभव घोणे, तर सचिवपदी गणेश पेडणेकर यांची निवड करण्यात आली आहे. बैठकीत जाहीर झालेल्या कार्यकारिणीनुसार उपाध्यक्षपदी प्रसाद भोगले व रामेश्वर आंधळे, कार्याध्यक्षपदी विश्वास वाघमारे व सतीश माने यांची निवड करण्यात आली. सहसचिवपदी संकेत फोंडेकर व सचिन तावडे यांची जबाबदारी देण्यात आली आहे. खजिनदारपदी मनोजकुमार पवार व प्रदीप जाधवर, तर सहखजिनदारपदी उदय मसुरकर व विनायक पाटील यांची निवड करण्यात आली.

महिला संघटक म्हणून मैथिली गोसावी, प्रसिद्धीप्रमुख म्हणून अनिल पवार व अर्जुन माजगावकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सल्लागारपदी संजय सावंत व संतोष भाट यांची निवड करण्यात आली. तसेच कार्यकारिणी सदस्यपदी अक्षय सूर्यवंशी, संदेश राणे, सागर कदम, भीमसेन येरलकर, पांडुरंग मैदाङ, सुनील कोकरे, संदीप शिरोडकर, दशरथ जाधव, इरफान मुलानी, अविनाश हारे, अशोक पुजारी, कुशल कंदम, राजू जाधव, महेश राणे, सत्यविजय जाधव, तबरेस शेख व विकास आकोसकर यांची निवड जाहीर करण्यात आली.

नवीन कार्यकारिणीच्या माध्यमातून संघटनात्मक बळकटी वाढवून एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांवर प्रभावीपणे काम करण्यात येणार असल्याचे पदाधिकाऱ्यांनी सांगितले.

You cannot copy content of this page