जागतिक महिला दिनानिमित्त बांदा येथे महिलांसाठी भजन स्पर्धेचे आयोजन…

⚡बांदा ता.२८-: जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा, बांदा शहर यांच्या वतीने खास महिलांसाठी भजन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. महिला कलागुणांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने हा सांस्कृतिक उपक्रम आयोजित करण्यात येत असल्याची माहिती आयोजकांनी दिली.
ही भजन स्पर्धा बुधवार दिनांक ११ मार्च रोजी दुपारी ३ वाजता बांदा येथील आनंदी मंगल कार्यालय येथे पार पडणार आहे. परिसरातील महिला भजनी मंडळांनी या स्पर्धेत मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
स्पर्धेसाठी काही नियम व अटी निश्चित करण्यात आल्या असून प्रत्येक भजनी मंडळात किमान ८ सदस्य असणे बंधनकारक राहील. प्रत्येक मंडळाला सादरीकरणासाठी ३० मिनिटांचा वेळ देण्यात येणार आहे. स्पर्धेत प्रथम नोंदणी करणाऱ्या ८ भजन मंडळांनाच सहभागाची संधी मिळणार आहे. स्पर्धेसाठी नाव नोंदणी करण्याची अंतिम तारीख दिनांक ६ मार्च अशी असून इच्छुकांनी संपर्क साधावा, असे आयोजकांनी कळविले आहे. नोंदणीसाठी सौ. अवंती पंडित (मो. ९२८४५७७७९५) व सौ. माधवी गाड (मो. ८३९०६१८६४८) यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
महिलांच्या सांस्कृतिक सहभागाला प्रोत्साहन देणारा हा उपक्रम ठरणार असून परिसरातील महिलांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

You cannot copy content of this page