कर्ले महाविद्यालयाचे ‘दस नंबरी’ यश, पुरस्कारांवर ठसा स्पष्ट.

करिअर कट्टाच्या १० पुरस्कारांवर मोहोर : ५व्या वर्धापनदिनी मुंबईत गौरव..

⚡देवगड ता.२८-: महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण विभाग व महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्र आणि सेंट झेवियर्स कॉलेज मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने यशवंतराव चव्हाण सेंटर येथे २५ फेब्रुवारी रोजी करिअर कट्टाच्या ५व्या वर्धापनदिनी पार पडलेल्या राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळ्यात शिरगांवच्या पुंडलिक अंबाजी कर्ले महाविद्यालयाने विविध स्तरांवरील १० पुस्स्कारावर नांव कोरले आहे.
महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण विभाग आणि महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने सुरु असणऱ्या करिअर कट्टा या उपक्रमांतर्गत घेण्यात आलेत्या राज्यस्तरीत महाविद्यालयीन स्पर्धा २०२५-२६ या पुरस्कार वितरण सोहळ्याचे उद्घाटन खादी ग्रामोद्योग मंडळाचे सभापती रविद्र साठे यांच्या हस्ते झाले तर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान उद्योगमंत्री उदय सामंत यांनी भुषविले.
देवगड तालुक्यातील पुंडलीक अंबांजी कर्ले महाविद्यालयाला कोकण विभागीय उत्कृष्ट महाविद्यालय म्हणून द्वितीय क्रमांक मिळविला आहे. सिंधुदुर्ग जिल्हा उत्कृष्ट महाविद्यालय प्रथम क्रमांक, सिंधुदुर्ग जिल्हा उत्कृष्ट महाविद्यालयीन समन्वयक म्हणून प्राध्यापिका अक्षता मोंडकर यांना प्रथम क्रमांक पटकाविला आहे. सिंधुदुर्ग जिल्हा उत्कृष्ट प्राचार्य म्हणून डॉ. समीर तारी यांना द्वितीय क्रमांक मिळाला आहे. सोलर एनर्जी अवरनेस प्रोग्राममध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यात महाविद्यालयाला प्रथम क्रमांक, सिंधुदुर्ग जिल्हा उत्कृष्ट करिअर संसद म्हणून करिअर संसदेला प्रथम क्रमांक, करिअर कट्टा आयोजित रिल्स स्पर्धेत राज्यस्तरीय तृतीय तसेच सिंधुदुर्ग जिल्हा रिल्स स्पर्धेत प्रथम असे दोन पुरस्कार मिळाले. सामाजिक बांधीलकी म्हणून मराठवाड्यातील पूरग्रस्त विद्यार्थ्यांसाठी सहाय्य केल्याबद्दल सन्मानपत्र व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. ए.डब्ल्यू.एस करीअर र्टूर्स स्पर्धेत तृतीय क्रमांक मिळाला. महाविद्यालयाच्यावतीने प्राचार्य समिर तारी आणि करिअर कट्टा समन्वयक प्राध्यापिका अक्षता मोंडकर यांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. यावेळी महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्राचे अध्यक्ष यशवंत शितोळे, सेंट झेवियर्स महाविघालयाच्या प्राचार्या करुणा गोकर्ण, विभागीय प्राचार्य प्रवर्तक डॉ.अतुल साळुंखे, डॉ.दिपा वर्मा, डॉ. प्रज्ञा प्रभू, स्नेहा जगदाळे, डॉ.बबन सिनगारे आदी मान्यवर उपस्थित होते.
महाविद्यालयाने मिळविलेल्या या नेत्रदीपक यशाबद्दल संस्थाध्यक्ष अरुण कर्ले सर्व संचालक व पदाधिकारी यांनी अभिनंदन केले आहे.

फोटो कॅप्शन :
मुंबई येथे करिअर कट्टाच्या वर्धापनदिनी महाविद्यालयाचे प्राचार्य समिर तारी,समन्वयक प्राध्यापिका अक्षता मोंडकर यांना मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.

You cannot copy content of this page