Headlines

“जिंकू किंवा हरू, शेवटपर्यंत लोकांसाठी लढणार”…

अपक्ष उमेदवार अमय पै यांचा निर्धार:आम्ही इस्त्रीचे कपडे घालून भाषण करणारे नाही, तर तळागाळात जाऊन काम करणारा व्यक्ती आहे.. ⚡सावंतवाडी ता.३१-:मी जिंकू किंवा हरू, मात्र शेवटपर्यंत लोकांसाठी लढत राहणार आहे. मी सर्वसामान्य कुटुंबातून आलेला असल्यानेच मला लोकांचा आशीर्वाद मिळत आहे, अशी प्रतिक्रिया तळवडा जिल्हा परिषद मतदारसंघातील अपक्ष उमेदवार अमय पै यांनी आज येथे व्यक्त केली….

Read Full News

उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना उद्या सावंतवाडीत सर्वपक्षीय श्रद्धांजली सभा…

आरपीडी हायस्कूल हॉलमध्ये सकाळी ११ वाजता शोकसभा; सर्वपक्षीय पदाधिकारी व नागरिकांना उपस्थित राहण्याचे संजू परब यांचे आवाहन.. सावंतवाडी ता.३१-: महाराष्ट्राचे विद्यमान उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री राज्यातील जनतेच्या हृदयातील दादा, स्पष्ट व तडकाफडकी निर्णय घेण्यात वाकबगार असलेले महाराष्ट्राचे एक वजनदार व प्रशासनावर भक्कम पकड असलेले अजातशत्रू अजितदादा पवार यांचे विमान अपघातात दुर्दैवी अकाली निधन झाले. त्यांना भावपूर्ण…

Read Full News

रेडी जि. प. मतदारसंघाचे उमेदवार प्रितेश राऊळ यांच्या प्रचारास उस्फूर्त प्रतिसाद…

⚡वेंगुर्ला ता.३०-: वेंगुर्ला तालुक्यातील रेडी जिल्हा परिषद मतदारसंघाचे महायुतीचे ( भाजपचे ) उमेदवार प्रितेश शंकर राऊळ यांच्या प्रचारास भरीव प्रतिसाद मिळत आहे. रेडी पं. स. उमेदवार प्रियांका घाटवळ व शिरोडा पं. स. उमेदवार शीतल साळगावकर यांचाही प्रचारासाठी नागरिकांची मोठी गर्दी होत आहे. रेडी प्रसिद्ध श्री गणपती मंदिर, रेडी माऊली मंदिर येथून प्रचाराचा शुभारंभ जोरदार झाला…

Read Full News

संजू परब उद्या तळवडा जिल्हा परिषद मतदारसंघाच्या दौऱ्यावर…

कार्यकर्त्यांना काय कानमंत्र देणार..?: याकडे आता सर्वांचे लक्ष.. ⚡सावंतवाडी ता.३०-: तळवडा जिल्हा परिषद मतदारसंघात संजू परब यांचा उद्या दौरा आयोजित करण्यात आला आहे. या दौऱ्यादरम्यान ते मतदारसंघातील प्रमुख कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी घेणार असून सध्याच्या राजकीय परिस्थितीवर चर्चा करणार आहेत.तळवडा मतदारसंघात संजू परब यांना मानणारा मोठा कार्यकर्तावर्ग असल्याने त्यांच्या दौऱ्याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. विशेषतः उद्या…

Read Full News

देवगडच्या विकासात मोलाचे योगदान देणाऱ्या अजितदादांची अकाली एक्झिट मनाला चटका देणारी…

नंदकुमार घाटे:देवगड राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) पक्षाच्यावतीने शोकसभा ; विविध स्तरांतून श्रद्धांजली.. ⚡देवगड ता ३०-:देवगडच्या विकासप्रक्रियेत योगदान देणाऱ्या अजितदादांची अकाली एक्झिट ही मनाला चटका देणारी असून कार्यकर्त्यांशी व सर्वसामान्य जनतेशी आपुलकीने वागणारा, दिलदार, धुरंधर लोकनेत्याला मुकलो, अशा शब्दांत राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते नंदकुमार घाटे यांनी अजितदादा पवार यांना आदरांजली वाहिली.अजितदादा पवार यांनी पाण्यासारख्या महत्त्वाच्या प्रश्नासाठी अन्नपूर्णा नदीतील…

Read Full News

डॉ. दत्ता सामंत इंग्लिश स्कूल देवबाग हायस्कूलचे शासकीय रेखाकला परीक्षेत घवघवीत यश…

⚡मालवण ता.३०-:महाराष्ट्र शासनातर्फे घेण्यात आलेल्या एलिमेंटरी आणि इंटरमिजिएट या दोन्ही शासकीय रेखाकला परीक्षेमध्ये डॉ. दत्ता सामंत इंग्लिश स्कूल देवबाग हायस्कूलनेघवघवीत यश संपादन करतानाच प्रशालेचा निकाल शंभर टक्के लागला. अखिल देवबाग विकास मंडळ मुंबई संचलित डॉ. दत्ता सामंत इंग्लिश स्कूल देवबाग हायस्कूल ने शासकीय रेखाकला परीक्षेत घवघवीत यश संपादन केले. महाराष्ट्र शासनातर्फे एलिमेंटरी आणि इंटरमिजिएट या…

Read Full News

नेरुर येथे उद्या मोफत दंतमुख तपासणी आणि आरोग्य जनजागृती शिबिर…

⚡कुडाळ ता.३०-: एशियन कॅन्सर फाऊंडेशन, बॅ नाथ पै फाऊंडेशन फॉर कोकण डेव्हलपमेंट, बॅ.नाथ पै कॉलेज ऑफ नर्सिग व कॉलेज ऑफ फिजिओथेरपी आणि कै. यशवंतराव नाईक ग्रामीण रुग्णालय व संशोधन केंद्र, नेरुर यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच सार्वजनिक आरोग्य विभाग, सिंधुदुर्ग,शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, सिंधुदुर्ग आणि जिल्हा सामान्य रुग्णालय, सिंधुदुर्ग यांच्या सहकायनि ‘मोफत दंतमुख तपासणी व आरोग्य जनजागृती…

Read Full News

महात्मा गांधी ही एक विचारधारा म्हणून आत्मसात करूया…

प्रा अरुण मर्गज:बॅ नाथ पै शिक्षण संस्थेत पुण्यतिथी निमित्त महात्मा गांधी याना अभिवादन.. ⚡कुडाळ ता.३०-: महात्मा गांधी एक नुसती व्यक्ती नाही तर ती विचारधारा आहे. ते तत्त्व आहे. ते जीवनमूल्य आहे. त्याचा अहिंसावाद नुसता वैचारिक वाद नाही तर जगाला प्रेम अर्पावे असा संदेश देणारा, जगाला आदर्शभूत असा गांधीवाद आहे. शस्त्र सज्ज जगताला विनाशापासून वाचवू शकणारा…

Read Full News

पाट हायस्कूल चित्रकला ग्रेड परीक्षेचा निकाल शंभर टक्के…

⚡कुडाळ ता.३०-: एस . एल .देसाई विद्यालय पाट विद्यालयात शासकीय रेखाकला परीक्षा 2025 यामध्ये यशाची परंपरा कायम ठेवत 100% निकाल लागलेला आहे. एलिमेंटरीआणि इंटरमिजिएट या दोन्ही परीक्षेमध्ये 80 विद्यार्थ्यांचा सहभाग होता. एलिमेंटरीसाठी 58 विद्यार्थी सहभागी झाले. यामध्ये 12 विद्यार्थ्यांना बी श्रेणी प्राप्त झाली.धनिशा निलेश परब आणि विघ्नेश भगवान खोत यांना ए श्रेणी मिळालेली आहे. तर…

Read Full News

विभागीय पॉवर लिफ्टिंग स्पर्धेत नील बांदेकर यांचे घवघवीत यश…

⚡सावंतवाडी, ता. ३०-:क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य पुणे, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय कोल्हापूर व जिल्हा क्रीडा परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित विभागीय पॉवर लिफ्टिंग स्पर्धा २०२५–२०२६ छत्रपती शिवाजी विद्यानिकेतन, पेठवडगाव, तालुका हातकणंगले, जिल्हा कोल्हापूर येथे दिनांक २७ जानेवारी २०२६ रोजी पार पडली.या स्पर्धेत श्री पंचम खेमराज कनिष्ठ महाविद्यालयाच्या इयत्ता १२ वी कला शाखेतील…

Read Full News

You cannot copy content of this page