ग्रीन रिफायनरीला विरोध झाला नसता तर पेट्रोल-डिझेल टंचाई नागरिकांना सहन करावे लागले नसते…

बबन साळगावकर यांचे मत; दूरदृष्टीअभावी निर्णय न झाल्याची व्यक्त केली खंत..

⚡सावंतवाडी ता.२७-:
ग्रीन रिफायनरी प्रकल्पाला सुरुवातीपासूनच पाठिंबा दिला असता, तर आज निर्माण झालेल्या पेट्रोल-डिझेल टंचाईचे चटके नागरिकांना सहन करावे लागले नसते, असे मत माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी व्यक्त केले.

ते पुढे म्हणाले की, ग्रीन रिफायनरीसारख्या मोठ्या आणि दूरदृष्टी असलेल्या प्रकल्पाला त्या वेळी योग्य पाठबळ मिळाले नाही. विशेष म्हणजे, जे लोक सुरुवातीला या प्रकल्पाला विरोध करत होते, तेच आज त्याचे समर्थन करताना दिसत आहेत. त्या काळात आम्ही ग्रीन रिफायनरीला पाठिंबा दिला होता, मात्र त्यावेळी आमच्यावर मोठ्या प्रमाणात टीका करण्यात आली होती, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.
साळगावकर यांनी सांगितले की, विकासाच्या दृष्टीने दूरदृष्टी ठेवून निर्णय घेतले असते, तर आजची परिस्थिती वेगळी असती. ग्रीन रिफायनरीमुळे स्थानिक पातळीवर रोजगार निर्मिती, आर्थिक विकास आणि इंधन उपलब्धतेत मोठा फायदा झाला असता, असेही त्यांनी म्हटले आहे.

You cannot copy content of this page