⚡सावंतवाडी ता.२३-: आजगाव येथील विद्या विहार इंग्लिश स्कूलमध्ये प्रशालेच्या माजी विद्यार्थ्यांचा शासन आदेशानुसार गुरुवार २ एप्रिल रोजी “माजी विद्यार्थी संघ” स्थापन करण्यात येणार असून या नूतन संघाच्या वतीने प्रशालेच्या प्रगतीसाठी , हितासाठी संघाच्या माध्यमातून विविध शैक्षणिक,सामाजिक कार्य करण्यात येणार आहे.
तसेच प्रशालेचे माजी विद्यार्थी सुरेंद्र विजयराव भोसले यांनी प्रशालेस प्रदान केलेला, भारताचे माजी केंद्रीय मंत्री तथा आझाद हिंद सेनेचे सेना प्रमुख जनरल जगन्नाथराव भोसले “डिजिटल बोर्ड” चा उद्घाटन कार्यक्रम याच दिवशी सायंकाळी ३:३० वाजता होणार असून, या डिजिटल बोर्ड चा प्रशालेच्या विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगती ,प्रशालेचा विकास होण्यास मदत होणार आहे. तरी या कार्यक्रमाला सर्वांनी उपस्थित राहण्याचे आवाहन मुख्याध्यापक उत्तम भागीत तसेच शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी वर्ग विद्या विहार इंग्लिश स्कूल आजगाव यांनी केले आहे.
विद्या विहार इंग्लिश स्कूल आजगाव येथे २ एप्रिल रोजी डिजिटल बोर्डचे उद्घाटन…
