तेंडोलीत हनुमान जयंती निमित्त २९ पासून दशावतार नाट्यमहोत्सव…

⚡कुडाळ ता.२७-: तालुक्यात तेंडोली येथील श्री वावळेश्वर हनुमान सेवा मंडळाच्यावतीने २९ मार्च ते २ एप्रिल या कालावधीत श्री वावळेश्वर हनुमान मंदिरात दशावतारी नाट्य महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. रोज रात्री 8 वाजता नाट्यप्रयोग सुरु होईल.
२९ रोजी मोरेश्वर दशावतार मंडळ (मोरे) यांचे ‘साक्षात्कार’ नाटक, ३० रोजी चेंदवणकर दशावतार मंडळ (चेंदवण) यांचे ‘कंदुकेश्वर लिंग स्थापना’ नाटक, ३१ रोजी हेळेकर दशावतार मंडळ (कारिवडे) यांचे ‘गणबिंदू घुबड’, १ एप्रिल रोजी बाल दशावतार मंडळ (माड्याचीवाडी) यांचे ‘मायाजाल’ नाटक, २ एप्रिल रोजी सकाळी ६ वाजता हनुमान जन्म, किर्तनकार रमेश प्रभू यांचे किर्तन, दुपारी १२ वाजता सत्यनारायण महापूजा, तिर्थप्रसाद,
सायंकाळी ५ वाजता स्थानिकांची भजने, ७ वाजता महाआरती, रात्री ८ वाजता पालखी प्रदक्षिणा, ९.३० वाजता श्री वावळेश्वर दशावतार मंडळ (तेंडोली) यांचे ट्रिकसिनयुक्त ‘अयोध्याधीश श्रीराम’ नाटक होणार आहे.
उपस्थित राहण्याचे आवाहन श्री वावळेश्वर हनुमान सेवा मंडळ (तेंडोली) यांनी केले आहे.

You cannot copy content of this page