मालवणात ५ रोजी सकल हिंदू संमेलन…

⚡मालवण ता.२६-:
मालवण दशक्राेशी मधील हिंदू समाजामध्ये स्वत्वाची जाणीव होऊन हिंदू समाजामध्ये ऐक्याची भावना कायम रहावी यासाठी सकल हिंदू समाजाच्या वतीने रविवार दिनांक ५ एप्रिल रोजी आर.जी.चव्हाण मंगल कार्यालय, वायरी येथे सायंकाळी ४ वाजता हिंदू संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे.

या हिंदू संमेलनात प्रमुख व्याख्यात्यांच्या स्फूर्तीदायक व्याख्यानाबरोबरच मालवण मधील तरुण कलासंपन्न व्यक्तींच्या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे. हिंदू समाजामध्ये नवचैतन्य निर्माण करण्यासाठी या संमेलनाला मालवण दशक्राेशीमधील हिंदू नागरिकांनी आपल्या कुटुंब आणि मित्रपरिवारासह मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन सकल हिंदू संमेलन समितीचे संयोजक ॲड. पलाश लीलाधर चव्हाण, सहसंयोजक अविनाश काेळंबकर, साै. शिल्पा गाड, कोषाध्यक्ष विनायक न्हिवेकर यांनी केले आहे.

You cannot copy content of this page