Headlines

मालवणात १०९ कर्मचाऱ्यांनी केले मतदान…

⚡मालवण ता.०१-:मालवण तालुक्यातील निवडणूक प्रक्रियेत सहभागी शासकीय कर्मचाऱ्यांनी शनिवारी मामा वरेरकर नाट्यगृह, मालवण याठिकाणी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी पहिले मतदान केले. यासाठी नाट्यगृह याठिकाणी खास मतदान कक्ष स्थापन करण्यात आला होता. ७ फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे. यामध्ये शासकीय कर्मचारी मतदान केंद्रावर अधिकारी म्हणून नियुक्त असल्याने त्यांना टपाली मतदानाचा अधिकार उपलब्ध करून देण्यात आला…

Read Full News

तरुणांना संधी देणारा आणि शाश्वत विकासाला दिशा देणारा अर्थसंकल्प…

विजय केनवडेकर:उद्योजकतेला बळ मिळून रोजगारनिर्मितीला गती मिळेल.. ⚡मालवण ता.०१-:केंद्र सरकारने सादर केलेला हा अर्थसंकल्प तरुणांना प्रोत्साहन देणारा असून, मागील चार अर्थसंकल्पांतील धोरणांची सुसंगत पुढची पायरी असल्याचे स्पष्टपणे दिसून येते मागील अर्थसंकल्पांमध्ये नवीन उद्योग सुरू करण्यासाठी ज्या तरतुदी करण्यात आल्या होत्या, त्याचाच विस्तार करत या अर्थसंकल्पात शाश्वत विकासावर विशेष भर देण्यात आल्याने तरुणांना संधी देणारा आणि…

Read Full News

मसुरे मतदार संघात उबाठा शिवसेनेच्या उमेदवारांचा घरोघरी प्रचारावर जोर…

⚡मालवण ता.०१-:मसुरे जिल्हा परिषद मतदार संघातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उमेदवार सौ. आनंदी आबा परब आणि मसुरे पंचायत समिती मतदार संघांचे उमेदवार वैभव सुरेश चव्हाण यांच्या प्रचाराचा शुभारंभ मसुरे टोकळवाडी येथे करण्यात आला. या प्रचारादरम्यान उबाठा शिवसेना पक्षाच्या उमेदवार सौ. आनंदी परब व वैभव चव्हाण यांनी घरोघरी जाऊन प्रचार पत्रकांचे वाटप करून या भागाच्या…

Read Full News

जे काही बोलेन ते निवडणुकीनंतर, आता केवळ विकासाच्या माध्यमातूनच बोलेन…

सुदन उर्फ सुधा कवठणकर:सातार्डा येथे ग्रामदेवतांच दर्शन घेऊन प्रचाराचा केला शुभारंभ.. ⚡सावंतवाडी ता.०१-:आरोंदा जिल्हा परिषद मतदारसंघातील राजकीय रणधुमाळीला आता खऱ्या अर्थाने सुरुवात झाली असून शिवसेना-भाजप युतीचे अधिकृत उमेदवार सुदन उर्फ सुधा कवठणकर यांनी आपल्या प्रचाराचा श्रीगणेश अत्यंत उत्साहात केला आहे. सातार्डा येथील ग्रामदैवत श्री देव रवळनाथ चरणी नतमस्तक होऊन आणि विजयाचा कौल मागत श्रीफळ वाढवून…

Read Full News

मिलाग्रीस मराठी प्रशालेत शाळा व्यवस्थापन व विद्यार्थी सुरक्षा समितीची संयुक्त सभा संपन्न…

⚡सावंतवाडी ता.०१-: सावंतवाडी येथील मिलाग्रीस मराठी प्रायमरी स्कूलमध्ये शाळा व्यवस्थापन समिती व विद्यार्थी सुरक्षा समिती यांची संयुक्त सभा यशस्वीपणे पार पडली. या सभेत विद्यार्थी ऑनलाईन हजेरी, विद्यार्थी उपस्थिती, शालेय सहल तसेच विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसंदर्भातील विविध महत्त्वाच्या विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.या सभेला शाळा व्यवस्थापन समितीचे स्थानिक प्राधिकरण सदस्य मंगेश तळवणेकर, विद्यार्थी सुरक्षा समितीच्या स्थानिक प्राधिकरण सदस्या…

Read Full News

…तर जि प सदस्य आपलाच पाहिजे

आम. निलेश राणे:पावशी-मिटक्याचीवाडी येथे आम. निलेश राणे यांची प्रचारसभा.. ⚡कुडाळ ता.०१-: तालुक्यातील पावशी मतदारसंघातील जिल्हा परिषद प्रशासकीय मान्यता मिळालेली 15 कोटी 51 लाख रकमेची 29 कामे आहेत. ही कामे आता थांबणार नाहीत. मागच्या अनेक वर्षापासून आपण विकास कामापासून वंचित राहिलो. पालकमंत्री, खासदार, आमदार आपले मग जिल्हा परिषद सदस्य पण आपलाच पाहिजे. कुठेही निधी कमी पडू…

Read Full News

जिल्ह्यातील ‘उबाठा’ युनिट रिकामटेकडं…

आम. निलेश राणे:’उबाठा’कडे उमेदवारच नाहीत:पावशी येथे निलेश राणे यांचा घणाघात.. ⚡कुडाळ ता.०१-: शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडे सध्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी उमेदवारच उरलेले नाहीत. त्यांनी धरून-पकडून आणि जबरदस्तीने लोक उभे केले आहेत, जे आता स्वतःच्याच नेत्यांना शिव्या घालत आहेत. त्याचबरोबर सिंधुदुर्गातील उबाठा युनिट हे पूर्णपणे ‘रिकामटेकडं’ आहे. त्यामुळे आम्ही त्यांच्या टीकेची दखलही…

Read Full News

जिल्हाधिकाऱ्यांची कुडाळ तहसीलला भेट ; निवडणूक कामाचा घेतला आढावा…

⚡कुडाळ ता.०१-: जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूक साठी मतदान येत्या 7 फेब्रुवारीला होणार आहे आणि मतमोजणी 9 फेब्रुवारी रोजी होणार आहे. त्या अनुषंगाने प्रशासनाची तयारी जोरात सुरू आहे. कुडाळ तहसील कार्यालय येथे सुद्धा ही तयारी या तयारीने जोर पकडला आहे. आज कुडाळ तहसील कार्यालयामध्ये मतदान यंत्र मतदानासाठी तयार करणे आणि सीलबंद करणे ही कामे…

Read Full News

विद्या विकास हायस्कूल , आरोस चे कथाकथन स्पर्धेत यश…

⚡सावंतवाडी ता.०१-: कै. प्रा. उदय रमाकांत खानोलकर वाचन मंदिर मळगाव आयोजित , जिल्हास्तरीय शालेय कथाकथन स्पर्धेत, आरोस पंचक्रोशी विद्या विकास हायस्कूल आरोस या विद्यालयाच्या इयत्ता सातवीतील कु. श्रेया श्रीकृष्ण खोत हिने प्रथम क्रमांक तर कु. पूर्वा शत्रुघ्न मुळीक हिने उत्तेजनार्थ क्रमांक प्राप्त केला.या यशाबद्दल आरोस पंचक्रोशी विद्या विकास मंडळाचे अध्यक्ष रोहिदास सावंत, उपाध्यक्ष निलेश परब,…

Read Full News

दीपक केसरकरांच्या विकासकामांचा मला निश्चित लाभ होईल…

झेवियर फर्नांडिस: ९ तारखेला गुलाल आमचाच.. ⚡ सावंतवाडी ता.०१-:इन्सुली जिल्हा परिषद मतदारसंघात दीपक केसरकर यांच्या माध्यमातून अनेक विकासकामे मार्गी लागली आहेत. या विकासकामांचा निश्चितच मला निवडणुकीत फायदा होईल, असा विश्वास शिंदे शिवसेनेचे जिल्हा परिषद उमेदवार झेवियर फर्नांडिस यांनी व्यक्त केला. ते पुढे म्हणाले की, माझ्या विरोधात जे उमेदवार उभे आहेत, त्यांना मी आव्हान मानत नाही….

Read Full News

You cannot copy content of this page