Headlines

भाजपचे जेष्ठ नेते रमेश दळवी यांच्या निधनानंतर भाजप युवा नेते विशाल परब यांची कुटुंबीयांना सांत्वनपर भेट…

⚡दोडामार्ग ता.१८-: पक्ष नेते रमेश दळवी यांच्या निधनाने संपूर्ण तालुका शोकमग्न झाला असून त्यांनी निर्माण केलेली पोकळी आजही प्रकर्षाने जाणवत आहे. त्यांच्या कार्याची, स्वभावातील आपुलकीची आणि कार्यकर्त्यांशी असलेल्या जिव्हाळ्याच्या नात्याची आठवण काढताना अनेकांच्या डोळ्यांत अश्रू तरळत आहेत.या पार्श्वभूमीवर भाजप युवा नेते विशाल परब यांनी दळवी कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन केले. ही भेट केवळ औपचारिक न…

Read Full News

सिंधुदुर्ग महाविद्यालयाच्या एनसीसी विद्यार्थ्यांना राष्ट्रभक्तीचा निरोप…

⚡मालवण ता.१८-:मालवण येथील स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयात कार्यरत असणाऱ्या एनसीसी विभागामध्ये तिसऱ्या वर्षाला असणाऱ्या NCC कॅडेट -विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ संपन्न झाला. यावेळी भंडारी ए. सो. कनिष्ठ महाविद्यालय मालवणचे प्रा पवन बांदेकर यांनी एनसीसी विद्यार्थ्यांनी घरामध्ये सेवा कशी करावी ? समाजामध्ये वावरत असताना स्वच्छतेच्या माध्यमातून तसेच राजकारण, अर्थकारण, समाजकारण आणि संरक्षण दलामध्ये काम करून राष्ट्रभक्ती…

Read Full News

रामेश्वर मच्छिमार सहकारी सोसायटीतर्फे सभासदांना भेटवस्तू वाटप…

⚡मालवण ता.१८-:मालवण दांडी येथील श्री रामेश्वर मच्छिमार सहकारी सोसायटी मध्ये सभासदांना भेटवस्तू वाटप कार्यक्रम संपन्न झाला. संस्थेला सन २०२४-२५ या आर्थिक वर्षामध्ये झालेल्या नफ्यातून सभासदांना भेटवस्तू देण्यात आल्या. या कार्यक्रमास सिंधुदुर्ग जिल्हा श्रमजिवी रापण संघाचे सचिव दिलीप घारे, मच्छिमार नेते छोटू सावजी, अखिल महाराष्ट कृती समिती सिंधुदुर्ग जिल्हा अध्यक्ष मिथुल मालंडकर तसेच श्रीकृष्ण मंदिर धुरीवाडा…

Read Full News

मालवणात जखमी बेवारस गायीला गोसेवकांची मदत;

⚡मालवण ता.१८-:मालवण शहरात गेले अनेक दिवस पायाला दुर्धर आजार झालेली गाय बेवारसपणे फिरत होती. याची माहिती मिळताच मालवणमधील गो सेवक व बजरंग दलाच्या युवकांनी वैभववाडी खांबाळे येथील गाय वासरू गो शाळेशी संपर्क साधून या गायीची त्याठिकाणी रवानगी केली. सदरील गो शाळेत जागा उपलब्ध नव्हती. पण या गायीवर उपचार होण्याची गरज युवकांनी निदर्शनास आणून देताच त्यांच्या…

Read Full News

स्वच्छतेच्या चळवळीत तालुक्यातील तीन ग्रामपंचायतींची उल्लेखनीय झेप…

⚡दोडामार्ग ता.१८-:संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान सन २०२५–२०२६ अंतर्गत तालुक्यातील ग्रामपंचायतींनी स्वच्छता, आरोग्य आणि पर्यावरण संवर्धनासाठी प्रभावी उपक्रम राबवित उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. अभियानाच्या मूल्यमापनानंतर विविध जिल्हा परिषद प्रभागांमधून उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या ग्रामपंचायतींची निवड जाहीर करण्यात आली आहे.साटेली–भेडशी प्रभागातून सहभागी झालेल्या ११ ग्रामपंचायतींपैकी ग्रामपंचायत केर-भेकुर्लीची निवड करण्यात आली. मणेरी प्रभागातील १३ ग्रामपंचायतींमधून ग्रामपंचायत आडाळी, तर माटणे प्रभागातील…

Read Full News

वैभव नाईक यांच्या आमदारकीच्या दहा वर्षाच्या काळात मच्छिमारांना ३५२ नोटीसा…

आम. निलेश राणे यांचा वैभव नाईकांवर पलटवार.. ⚡मालवण ता.१८-:किनारपट्टीवरील बांधकामे हटविण्याबाबत मालवण मधील मच्छिमारांना आपल्या काळात नोटीसा आल्या नाहीत असे वक्तव्य करणाऱ्या माजी आमदार वैभव नाईक यांचा अभ्यास कमी आहे. वैभव नाईक यांच्या आमदारकीच्या काळात गेल्या दहा वर्षात मच्छिमारांना एकूण ३५२ नोटीसा प्राप्त झाल्या आहेत, याचे पुरावे व नोटीसा माझ्याकडे असून माहितीसाठी नाईक यांना हवे…

Read Full News

परुळेबाजार ग्रामपंचायतीचा25 फेब्रुवारी रोजी बेलापूर येथे होणार सन्मान…

⚡वेंगुर्ला ता.१८-: संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान अंतर्गत कोकण विभागीय स्पर्धेत सलग 2 वर्षे पुरस्कार प्राप्त करणार्‍या वेंगुर्ला तालुक्यातील परुळेबाजार ग्रामपंचायतिचा कोकण विभागाचे सन्मान 25 फेब्रुवारी 2026 रोजी दुपारी 2 वाजता कोकण विभागाच्या बेलापूर येथील आयोजित कार्यक्रमात पुरस्कार वितरण करण्यात येणार आहे. कोकण विभागीय कार्यालयाकडुन कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. परुळेबाजार ग्रामपंचायतीने राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छ…

Read Full News

मालवणच्या भंडारी हायस्कूलचा नागेंद्र तारी ‘विशेष प्राविण्य’सह जिल्हा गुणवत्ता यादीत स्थान…

⚡मालवण ता.१८-:महाराष्ट्र गणित अध्यापक मंडळातर्फे घेण्यात आलेल्या गणित प्राविण्य’ परीक्षेत मालवणच्या भंडारी ए.सो हायस्कूलचा इयत्ता पाचवी मधील विद्यार्थी कु.नागेंद्र युवराज तारी याने ‘विशेष प्राविण्य’ मिळवून जिल्हा गुणवत्ता यादीत स्थान पटकावले आहे. कु नागेंद्र हा आता ‘गणित प्रज्ञा’ परीक्षेसाठी पात्र ठरला आहे. कु. नागेंद्र तारी याला प्रशालेच्या सहाय्यक शिक्षिका पी जी मेस्त्री आणि ए ए गोवेकर…

Read Full News

आंबा बागायतदार शेतकरी शिष्टमंडळ उद्या घेणार पालकमंत्री ना. नितेश राणे यांची भेट..

⚡वेंगुर्ला ता.१८-: सद्या होत असलेल्या आंबा नुकसानीबाबत चर्चा करून पुढील दिशा ठरवण्यासाठी वेंगुर्ला तालुक्यातील सर्व आंबा बागायतदार शेतकरी व व्यापारी ( करारधारक व्यापारी) यांची एकत्रित बैठक आज बुधवारी दि. १८ फेब्रुवारी रोजी सायंकाळी जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी यांच्या अध्यक्षतेखाली सिंधुदुर्ग जिल्हा बँक वेंगुर्ले शाखा येथे संपन्न झाली. याबाबत मनीष दळवी यांच्यासमवेत सविस्तर चर्चा झाल्यानंतरशेतकऱ्यांचे…

Read Full News

फुकेरी येथील ऐतिहासिक हनुमंत गडावर उद्या शिवजन्मोत्सव सोहळा…

सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थान सिंधुदुर्ग विभाग आणि फुकेरी ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमानातून आयोजन.. ⚡सावंतवाडी ता.१८-: दोडामार्ग तालुक्यातील फुकेरी गावात असलेल्या ऐतिहासिक हनुमंत गडावर उद्या गुरुवार १९ फेब्रुवारी रोजी शिवजन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. हा कार्यक्रम सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थान सिंधुदुर्ग विभाग आणि फुकेरी ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमानातून आयोजित करण्यात आला आहे.छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त आयोजित…

Read Full News

You cannot copy content of this page