Headlines

चतुर्थी पूर्वी रस्त्यातील खड्डे बुजवा

अन्यथा भीक मांगो आंदोलन;मनसेचा इशारा *⚡सावंतवाडी ता.२५-:* सावंतवाडी तालुक्यात रस्त्यांची दुरवस्था झाली असून, तोक्ते चक्रीवादळा नंतर अनेक ठिकाणी रस्त्यावरील धोकादायक झाडेझुडपे अजूनही तोडण्यात आली नाहीत. गणेश उत्सव जवळ येत असताना देखील तालुक्यात रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहे. त्यामुळे चतुर्थीपूर्वी सर्वे खड्डे न बुजवल्यास सावंतवाडी तालुका मनसे तर्फे भिक मांगो आंदोलन करण्यात येईल. असा इशारा कार्यकारी…

Read More

श्री गांगेश्वर पावणाईदेवी ग्रामस्थ मंडळ नडगीवेतर्फे उमरठ पूरग्रस्तांना आर्थिक मदत

*⚡कणकवली ता.२५-:* कणकवली तालुक्यातील नडगिवे या गावातील श्री गांगेश्वर पावणाईदेवी ग्रामस्थ मंडळ मुंबई.नडगिवे या मंडळाच्या वतीने नुकत्याच मुक्काम गाव – उमरठ ता.पोलादपूर,जि.रायगड येथील पूरग्रस्त बांधवांना सुमारे ५१०००/- रुपयांची आर्थिक मदत करण्यात आली. रत्नागिरी व रायगड जिल्ह्यात पूर आला होता.यामुळे अनेकांचे संसार उघडयावर पडले होते. तर काही लोक मृत्यूमुखी पडले होते. याची दखल घेऊन कणकवली तालुक्यातील…

Read More

नारायण राणेंना जामीन झाल्याने आचरा येथे भाजपचा जल्लोष

*⚡मालवण ता .२५-:* मुख्यमंत्र्यांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याच्या कारणावरून अटक करण्यात आलेल्या केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना महाड न्यायालयाने मंगळवारी रात्री उशिरा जामीन मंजूर केला. यामुळे राणे समर्थक व भाजप कार्यकर्ते यांनी मध्यरात्री ठिकठिकाणी जल्लोष केला. आचरा येथे भाजप कार्यकर्त्यांनी फटाके फोडून आनंद व्यक्त केला. यावेळी भाजपचे तालुकाध्यक्ष धोंडू चिंदरकर, जि. प. सदस्य जेरोन फर्नांडिस, संतोष…

Read More

लायन्स क्लब ऑफ सावंतवाडी अध्यक्षपदी अँड परिमल नाईक

*⚡सावंतवाडी ता.२५-:* लायन्स क्लब ऑफ सावंतवाडी च्या अध्यक्षपदी अँड. परीमल नाईक यांची एकमताने निवड करण्यात आली आहे. पदग्रहण शपथविधी कार्यक्रमात त्यांची ही निवड करण्यात आली आहे. याप्रसंगी उपस्थित सर्व सदस्यांनी व पदाधिकाऱ्यानी त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

Read More

जिल्ह्यातील पाऊस व पाणीसाठा

*⚡सिंधुदुर्गनगरी दि.२५-:* तिलारी-आंतरराज्य प्रकल्पामध्ये 358.6990 द.ल.घ.मी पाणीसाठा असून धरण 80.18 टक्के भरले आहे. या धरणाच्या पालणलोट क्षेत्रात गेल्या चोवीस तासात 1.80 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यातील मध्यम व लघु पाटबंधारे प्रकल्पात पुढीलप्रमाणे पाणीसाठा असून सर्व आकडे द.ल.घ.मी. परिमाणात आहेत. देवघर – 76.9230, अरुणा – 78.1357, कोर्ले- सातंडी – 25.4740. लघु पाटबंधारे प्रकल्पातील पाणीसाठा पुढीलप्रमाणे आहे….

Read More

वेंगुर्ला तालुक्यात सर्वाधिक 10 मि.मी. पाऊस

*⚡सिंधुदुर्गनगरी दि.२५-:* जिल्ह्यात गेल्या चोवीस तासात वेंगुर्ला तालुक्यात सर्वाधिक 10.6 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात सरासरी 2.325 मि.मी. पाऊस झाला असून 1 जून पासून आतापर्यंत एकूण सरासरी 3109.4825 मि.मी. पाऊस झाला आहे. तालुका निहाय पावसाची आकडेवारी पुढील प्रमाणे आहे. कंसातील आकडे आतापर्यंतच्या पावसाचे असून सर्व आकडे मिलीमीटर परिमाणात आहेत. वेंगुर्ला – 10.6(2466.8), वैभववाडी –…

Read More

जिल्हास्तरीय ऑनलाईन कथा कथन स्पर्धेत अस्मी मांजरेकर प्रथम

तर शमिका चिपकर द्वितीय आणि वेदांगी कविटकर तृतीय *⚡सावंतवाडी ता.२५-:* छत्रपती सेवा प्रतिष्ठान माणगाव आयोजित जिल्हास्तरीय ऑनलाईन कथा कथन स्पर्धेत आरपीडी हायस्कुल सावंतवाडीची पाचवीची विद्यार्थिनी अस्मि प्रवीण मांजरेकर हिने प्रथम क्रमांक पटकावला आहे. कुडाळ हायस्कुल ची शमिका सचिन चिपकर हिचा द्वितीय तर हळदीचे नेरूर केंद्रशाळेची वेदांगी प्रवीण कविटकर हिने तृतीय क्रमांक पटकवला आहे. मावळ्यांच्या शौर्य…

Read More

जिल्ह्यात ७ सप्टेंबरपर्यंत मनाई आदेश

*⚡सिंधुदुर्गनगरी, दि.२४-:* जिल्ह्यात कोणताही अनुचित प्रकार घडू नये. कायदा व सुव्यवस्था परिस्थिती अबाधित रहावी , यासाठी आजपासून ७ सप्टेंबर रोजी रात्री १२ वाजेपर्यंत महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ च्या ३७(१) (३) नुसार मनाई आदेश लागू केल्याचा आदेश जिल्हादंडाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी आज दिला.* पोलीस अधीक्षकांनी निदर्शनास आणल्यानुसार सद्यस्थितीत राज्यात वेगवेगळे राजकीय पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते राजकीय…

Read More

भाजप कार्यकर्त्यांनी मुंबई गोवा महामार्ग रोखला

कुडाळ रस्त्यावर टायर जाळून केला ठाकरे सरकारचा निषेध *⚡कुडाळ ता.२४-:* केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना अटक केल्यानंतर त्याचे पडसाद आता सर्वत्र उमटू लागले आहेत. यातच मुंबई गोवा महामार्ग भाजप कार्यकर्त्यांनी रोखला असून, कुडाळ येथे रस्त्यावर टायर जाळून ठाकरे सरकारचा जोरदार निषेध करण्यात आला आहे.

Read More

खासदार विनायक राऊतांच्या सिंधुदुर्गातील घरावर अज्ञातांनी सोडा बॉटल फेकल्या

बाईकवरुन आलेले चौघे पळून जाण्यात यशस्वी *⚡सिंधुदुर्ग दि.२४-:* मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना अटक करण्यात आली आहे. या कारवाईचं जोरदार समर्थन शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी केलं आहे. त्यानंतर आता विनायक राऊत यांच्या सिंधुदुर्गातील घरावर अज्ञातांकडून हल्ला करण्यात आलाय. चार अज्ञात बाईकस्वारांनी विनायक राऊत यांच्या सिंधुदुर्गातील तळगाव इथल्या…

Read More
You cannot copy content of this page