*⚡मालवण ता .२५-:* मुख्यमंत्र्यांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याच्या कारणावरून अटक करण्यात आलेल्या केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना महाड न्यायालयाने मंगळवारी रात्री उशिरा जामीन मंजूर केला. यामुळे राणे समर्थक व भाजप कार्यकर्ते यांनी मध्यरात्री ठिकठिकाणी जल्लोष केला. आचरा येथे भाजप कार्यकर्त्यांनी फटाके फोडून आनंद व्यक्त केला. यावेळी भाजपचे तालुकाध्यक्ष धोंडू चिंदरकर, जि. प. सदस्य जेरोन फर्नांडिस, संतोष कोदे, संतोष गावकर, चिंदर उपसरपंच दीपक सुर्वे, दत्ता वराडकर, उदय घाडी, शेखर कांबळी, मनोज हडकर यासह अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.
नारायण राणेंना जामीन झाल्याने आचरा येथे भाजपचा जल्लोष
