*⚡कणकवली ता.२५-:* कणकवली तालुक्यातील नडगिवे या गावातील श्री गांगेश्वर पावणाईदेवी ग्रामस्थ मंडळ मुंबई.नडगिवे या मंडळाच्या वतीने नुकत्याच मुक्काम गाव – उमरठ ता.पोलादपूर,जि.रायगड येथील पूरग्रस्त बांधवांना सुमारे ५१०००/- रुपयांची आर्थिक मदत करण्यात आली. रत्नागिरी व रायगड जिल्ह्यात पूर आला होता.यामुळे अनेकांचे संसार उघडयावर पडले होते. तर काही लोक मृत्यूमुखी पडले होते. याची दखल घेऊन कणकवली तालुक्यातील नडगिवे या गावातील मुंबईकर ग्रामस्थ मंडळाच्या कार्यकर्त्यांच्या वतीने सामाजिक बांधिलकी जपत रायगड जिल्ह्यातील व पोलादपूर तालुक्यातील मु.उमरठ आणि चांदके या दोन गावातील ५१ कुटूंबाना प्रत्येकी १०००/- रुपये प्रमाणे सुमारे ५१०००/- रुपयांची आर्थिक मदत प्रत्यक्ष या गावात जाऊन येथील नागरिकांना करण्यात आली. यावेळी श्री गांगेश्वर पावणाईदेवी ग्रामस्थ मंडळ मुंबई नडगिवेचे कार्यकर्ते प्रकाश शामराव मण्यार,रघुनाथ शंकर शिरवाडकर, भास्कर शंकर राणे,अरविंद श्रीकृष्ण सावंत,रमेश मुकुंद पाटील,अरविंद मुकुंद आंबेरकर,प्रकाश शंकर राणे,कल्पेश तानाजी मण्यार आदी कार्यकर्ते उपस्थित होते.मंडळाच्या या स्तुत्य उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक केले जात असून पूरग्रस्त ग्रुप ग्रामपंचायत उमरठ ग्रामपंचायतचे सरपंच चंद्रकांत गजानन कळंबे यांनी नडगिवे ग्रामस्थ मंडळाच्या स्तुत्य उपक्रमाबद्दल आभाराचे पत्र मंडळाच्या कार्यकर्त्यांकडे जमा केले.
श्री गांगेश्वर पावणाईदेवी ग्रामस्थ मंडळ नडगीवेतर्फे उमरठ पूरग्रस्तांना आर्थिक मदत
