अन्यथा भीक मांगो आंदोलन;मनसेचा इशारा
*⚡सावंतवाडी ता.२५-:* सावंतवाडी तालुक्यात रस्त्यांची दुरवस्था झाली असून, तोक्ते चक्रीवादळा नंतर अनेक ठिकाणी रस्त्यावरील धोकादायक झाडेझुडपे अजूनही तोडण्यात आली नाहीत. गणेश उत्सव जवळ येत असताना देखील तालुक्यात रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहे. त्यामुळे चतुर्थीपूर्वी सर्वे खड्डे न बुजवल्यास सावंतवाडी तालुका मनसे तर्फे भिक मांगो आंदोलन करण्यात येईल. असा इशारा कार्यकारी अभियंता यांना निवेदनाद्वारे देण्यात आला आहे. यावेळी शहर अध्यक्ष आशिष सुभेदार, कार्याध्यक्ष संतोष भैरवकर, तालुका सचिव विठ्ठल गावडे, उपतालुका अध्यक्ष सुधीर राऊळ, ऋग्वेद सावंत, अभय देसाई, गोविंद सोनी आदी उपस्थित होते.
