ठाकरे सरकार बिथरले म्हणून सूड बुद्धीने राणेंवर कारवाई:राजन तेली

रिशेड्युल होताच जनआशीर्वाद यात्रा उत्सवाप्रमाणे यात्रा निघणार

*⚡कणकवली ता.२५-:* सिंधुदुर्ग जिल्ह्यात केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची जनआशीर्वाद यात्रा सुरु होणार होती.मात्र काल घडलेल्या घेतनेमुळे ही यात्रा पुढे ढकळलेली आहे.ही यात्रा भाजपा प्रदेश कार्यालयाकडून लवकरच रिशेड्युल येणार आहे.पहिल्यादाच केंद्रीय मंत्री नारायण राणे सिंधुदुर्ग जिल्ह्यात येणार असल्याने उत्सव,सण असावा अशी तयारी कार्यकर्त्यांनी केली होती.मात्र,ठाकरे सरकार बिथरले म्हणून सूड बुद्धीने राणेंवर कारवाई केली ,असल्याचा आरोप भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी केला.परिवहन मंत्री अनिल परब यांचा राणेंच्या अटकेबाबत पोलिसांवर दबाव टाकतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. यावरून राणेंना झालेली अटक ही सूडबुद्धीने केल्याचे सिद्ध होत असल्याचा आरोपही राजन तेली यांनी केला. कणकवली येथील भाजपा सिंधुदुर्ग जिल्हा कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.यावेळी तालुकाध्यक्ष मिलींद मेस्त्री, प्रसिद्धीप्रमुख बबलू सावंत, समर्थ राणे आदींसह भाजप पदाधिकारी उपस्थित होते. जन आशीर्वाद यात्रा पुढचा कार्यक्रम भाजपच्या प्रदेशच्या मान्यतेने जन आशीर्वाद यात्रा काढली जाणार आहे.पंतप्रधान मोदींनी राणेंच्या रुपाने कोकणला स्थान दिले आहे.त्याच्याकडील खात्याचा जास्तीत जास्त फायदा कोकणला होणार आहे.अनेक लोक गावगावात स्वागत करणार आहे.राणेंना भरभरुन आशीर्वाद लोक देतील,कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर आम्ही पुन्हा जाहीर करणार आहोत,असे राजन तेली यांनी सांगितले. परिवहन मंत्री अनिल परब यांची व्हिडीओ व्हायरल झाला आहे.राणेंच्या अटकेचा नियोजित प्लॅन होता,त्या प्रमाणे पोलीस अधीक्षक यांच्यावर दबाब सरकार टाकला, हे स्पष्ट झाले आहेत. माजी मुख्यमंत्री व केंद्रीय मंत्री राहिलेल्या राणेंवर अटकेची कारवाई केली.त्यामुळे कोकणी माणसाच्या मनात चीड निर्माण झाली आहे.पुढील काळात त्याचे परिणाम दिसतील,असा इशारा राजन तेली यांनी दिला आहे. आज सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रशासनावर सत्ताधाऱ्याचा अंकुश नाही,अनेक प्रकल्प रखडले आहेत.पूरस्थितीत बांदा पालकमंत्र्यांना जावं असं वाटलं नाही.अनेक भागात प्रशासन पोहचले नाही.जनतेला त्रास दिला जात आहे.विमानतळावर पाणी,लाईट पोहचली नाही.विमानतळावर गणपती आणला आहे,नोकर भरतीत अर्ज घेतले,पण भरतीसाठी ते अर्ज धूळखात आहे.अनेक प्रकल्पाना शिवसेनेच्या आमदार,खासदार यांनी विरोध केला.पालकमंत्री उदय सामंत हे जिल्हावासीयांची फसवणूक करत आहेत. सत्ताधारी केवळ विकास प्रकल्पाची घोषणा करतात. पण पूर्तता करत नाहीत. सी वर्ल्ड, आडाळी एमआयडीसी, नाणार प्रकल्पाला विरोध केला. केंद्रीय उद्योगमंत्री राणेंच्या माध्यमातून कोकणचा विकास होणार, हे स्पष्ट आहे. राणेंना केलेल्या अटकेची किंमत राज्य सरकारला कोकणी जनता मोजायला लावेल, असा इशाराही तेली यांनी दिला.आडेली एमआयडीसी राणेंनी आणली,अनेक लोक रोजगारासाठी गोव्यात जात आहेत.राणेंकडे कोकणातील लोकांच्या निश्चतपणे विश्वास राणेंवर आहेत .जनतेकडून राणेंकडे फार मोठी अपेक्षा आहे.कोकणी जनता हा प्रकार कधीही विसरणार नाही.या सगळ्या विरोधात न्यायालयात दाद मागणार आहे.कायदे काय आहेत,ते चांगले माहीत आहे.वैभव नाईक यांना कोण ओळखत नाही.शिवेसनेच्या आमदारांना वेगळा अधिकार नाही,असा टोला राजन तेली यांनी लगावला. जनतेचे आशीर्वाद घेण्यासाठी कुणाच्या परवानग्या घेण्याची गरज नाही.मनाई आदेशात आमदार,खासदार, पालकमंत्री फिरतात ,मग आमचा संघर्ष कोणाबरोबर नाही.राणेंच्या दौऱ्यात मनाई आदेश मागे घेतले जातील, असे राजन तेली यांनी सांगितले.

You cannot copy content of this page