स्वतंत्र कोकण राज्य हा आमचा जन्मसिध्द हक्क: प्रा . महेंद्र नाटेकर

*⚡कणकवली ता.२५-:* स्वराज्य हा माझा जन्मसिध्द अधिकार आहे आणि तो मी मिळवणारच अशी गर्जना लोकमान्य टिळकांनी करुन जनजागरण केले आणि त्यांच्याच प्रेरणेमुळे १५ ऑगस्ट १ ९ ४७ रोजी देशाला स्वातंत्र्य मिळाले . त्यानंतर तामिळनाडू , केरळ , गोवा ही सागरी राज्ये झालेच नाही . पण कोकणचे सागरी राज्य झालेच नाही. राज्य निर्मितीचे नियम धाब्यावर बसवून कोकणचे शोषण करण्यासाठी महाराष्ट्र राज्यात समावेश केला आणि उर्वरित महाराष्ट्र कोकणचे शोषण करीतच आहे . यासाठी स्वतंत्र कोकण राज्य निर्माण करणे हा आमचा हक्क असून तो आम्ही मिळवणारच , असा निर्धार स्वातंत्र्यदिनी प्रा . महेंद्र नाटेकर यांनी व्यक्त केला . स्वतंत्र कोकणची सभा विकास भवनमध्ये आयोजित केली होती. त्यावेळी प्रा. नाटेकर बोलत होते . यावेळी श्री. वाय. जी. राणे, प्रा . प्रकाश अधिकारी , प्राचार्य धनसे , श्री. वाय . जी. चिलवान , जे. जे. दळवी , प्रा. सुभाष गोवेकर , मनोहर हर्णे, अजित पाटील , संदीप सारंग , दिलीप लाड , गणेश सावंत इत्यादी उपस्थित होते . प्रा . नाटेकर पुढे म्हणाले , आपल्या राज्य घटनेत राज्यनिर्मितीचे तीन निकष देण्यात आले आहेत . १. सलग भूप्रदेश गोवा हद्दीपासून डहाणूपर्यंत आपला सलग भूप्रदेश आहे . २. ते राज्य चालविण्याची आर्थिक क्षमता पाहिजे . ती आर्थिक क्षमता आपल्या कोकणची आहे . कोकणचा तीन चतुर्थांश पैसा उर्वरित महाराष्ट्र व बिहार , यु.पी. इत्यादी मागास राज्यांकडे जातो . ३. बहुसंख्य लोकांची मागणी असली पाहिजे . सर्वच कोकणी लोकांना स्वतंत्र कोकण राज्य हवे , वरील तिन्ही निकषानुसार कोकण राज्य होऊ शकत असतानाही कुटील राजकारण करुन कोकण आणि उर्वरित महाराष्ट्र यांच्या मध्ये सह्याद्री पर्वत असतानाही ( सलगता नसतानाही ) राज्य घटना धाब्यावर बसवून महाराष्ट्र राज्यात कोकणचा समावेश केला तो कोकणचे शोषण करण्यासाठीच गोवा , केरळ , तामिळनाडू इत्यादी सागरी राज्यात १०० % शासकीस , निमशासकीय नोकऱ्या स्थानिकांना मिळतात तर कोकणी लोकांना फक्त ५ ते १० टक्के नोकऱ्या मिळतात ही कोकणची शोकांतिका आहे. कोकणात दिडशे इंच पाऊस पडूनही धरणाअभावी सारे पाणी समुद्रात जाते . विजयदुर्ग इत्यादी जागतिक दर्जाची बंदरे असूनही त्यांचा विकास केला जात नाही . ७२० किलो मिटर्सचा समुद्रकिनारा , घनदाट जंगले , आकर्षक धबधबे कोकणात आहेत.जगातले उत्तम पर्यटन स्थळ असूनही त्याची उपेक्षा केली जाते . पश्चिम महाराष्ट्रात पाच विद्यापीठे , विदर्भ , मराठवाड्यातही विद्यापीठे आहेत . पण कोकणात एकही विद्यापीठ नाही . मुंबई विद्यापीठ हे भारतीय विद्यापीठ झाले असल्याने तेथे विद्यार्थ्यांची प्रचंड गर्दी असते . हायस्कूल कॉलेज आणि आता तर प्राथमिक शाळातही प्राथमिक शिक्षकही उर्वरित महाराष्ट्रातील असतात . कोकणी भाषा आणि विद्यार्थ्यांची भिन्न मानसिकता लक्षात न घेता अध्यापन केल्याने शैक्षणिक दर्जा घसरत आहे . पंधरा – वीस टक्के आरक्षण नोकऱ्यांसाठी महाराष्ट्रात प्रचंड आंदोलने होत आहेत . पण नियमानुसार कोकणाला तामिळनाडू , केरळ व गोवा ह्या सागरी राज्याप्रमाणे शंभर टक्के नोकऱ्या मिळून इतरही अन्याय दूर होऊ शकतात , पण त्यासाठी स्वतंत्र कोकण राज्याची आवश्यकता आहे.आणि ते राज्य आपणाला राज्यघटनेनुसार मिळू शकते . आजही कोकणातील बी.सी. एस्. टी. एन्. टी, ओ. बी. सी.ना शासकीय आरक्षण मिळत नाही, मराठ्यांना आरक्षण मिळाले तर ते अर्थातच कोकणातील मराठ्यांना आरक्षण मिळणार नाही हे उघड आहे ! आणि म्हणून मिझोराम , छत्तासगड , झारखंड , तेलंगण इत्यादींनी प्रचंड आंदोलने करुन स्वतंत्र कोकण राज्ये निर्माण करावे लागेल . आणि म्हणून पक्षभेद विसरुन तमाम कोकणी बांधवांनी स्वतंत्र कोकण राज्य निर्मितीच्या आंदोलनात सहभागी व्हावे असे शेवटी प्रा . नाटेकरांना आवाहन केले . उपस्थित सर्वांना कोकणराज्य निर्माण करायचा निर्धार व्यक्त केला .

You cannot copy content of this page