Headlines

सिंधुदुर्ग जिल्हा चिरेखाण व्यावसायिक संघटनेच्या अध्यक्षपदी संतोष गावडे

⚡मालवण ता.०५-: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चिरेखाण व्यावसायिकांची सभा कसाल येथील सिध्दीविनायक हॉल या ठिकाणी पार पडली. यावेळी सिंधुदुर्ग चिरेखाण संघटनेची स्थापना करण्यात येऊन संघटनेच्या अध्यक्षपदी चौके येथील चिरेखाण व्यावसायिक श्री. संतोष गावडे यांची निवड करण्यात आली. यावेळी संघटनेच्या उपाध्यक्षपदी मिलिद साटम – देवगड, दत्ताराम राऊळ – दोडामार्ग, चंद्रकांत हडकर आचरा, महादेव पारकर- कणकवली तर सचिवपदी माळगांव…

Read More

पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी शहराध्यक्ष ज्ञानेश्वर सावंत यांना वाढदिवसानिमित्त दिल्या शुभेच्छा

⚡बांदा ता.०५-: सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी बांदा भाजप शहराध्यक्ष ज्ञानेश्वर सावंत यांच्या वाढदिवसानिमित्त पुष्पगुच्छ देऊन त्यांना शुभेच्छा दिल्या. श्री.चव्हाण यांनी स्वखर्चून बांदा आणि माणगाव प्राथमिक आरोग्य केंद्रांना हेल्थ केअर किट उपलब्ध करून दिलाय त्या किटचे लोकं पण सोहळ्यानिमित्त पालकमंत्री चव्हाण आज बांद्यात आले होते यावेळी त्यांना शुभेच्छा देण्यात आले.

Read More

मळगाव येथील रवळनाथ देवाचा ७ रोजी जत्रोत्सव*

⚡सावंतवाडी ता.०५सहदेव राऊळ- : मळगाव येथील पंचायतन श्री देव रवळनाथ देवाचा वार्षिक जत्रोत्सव ७ नोव्हेंबर रोजी साजरा होणार आहे.यनिमित्त सकाळपासून मंदिरात धार्मिक कार्यक्रम, दुपारी महाप्रसाद, केळी-नारळ ठेवणे, नवस बोलणे-फेडणे आदी कार्यक्रम होणार आहेत. रात्री मंदिराभोवती पालखी प्रदक्षिणानंतर मळगाव येथील दशावतार मंडळाचा नाट्यप्रयोग होणार आहे. भाविकांनी या जत्रोत्सवाचा लाभ घ्यावा, असे आवाहन ग्रामस्थ व देवस्थान कमिटीने…

Read More

पोलीसांनी चांगली सेवा, कर्तव्य करुन जनतेच्या मनातील स्थान कायम ठेवावे

पालकमंत्री रविंद्र चव्हाण ⚡सिंधुदुर्गनगरी ता.०५-: पोलिसांच्या खाकी वर्दीची ताकद फार मोठी आहे. वर्दीधारी पोलीसांना पाहून सर्वसामान्य जनतेच्या मनात सुरक्षिततेची भावना निर्माण होते. आपल्या सेवाकाळात पोलिसांनी चांगली सेवा, कर्तव्ये करुन जनतेच्या मनातील स्थान कायम ठेवावे, अशी भावना पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांनी व्यक्त केली. पोलीस अधीक्षक कार्यालयातील सभागृहात पालकमंत्र्यांनी सर्व अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेतली. सुरुवातीला पोलीस अधीक्षक…

Read More

नाविन्यपूर्ण संकल्पनेतून अधिकाऱ्यांनी कामकाज करावे

लोकाभिमुख प्रशासन, जनऔषधी केंद्र, पर्यटन वाढ, रोजगार निर्मिती, कुपोषणमुक्ती वर लक्ष केंद्रित करा – पालकमंत्री रविंद्र चव्हाण ⚡सिंधुदुर्गनगरी ता.०५-: नेहमीच्या कामकाजाशिवाय नव्या संकल्पना राबवत अधिकाऱ्यांनी कामकाज करावे. जिल्ह्यात रोजगार निर्मिती केल्यास तरुणांचे स्थलांतर थांबवण्यास मदत होईल. जिल्हा रुग्णालयात जनऔषधी केंद्र सुरु करुन जेनरिक औषधांचा पुरेसा साठा उपलब्ध करावा. बालकांच्या कुपोषण मुक्तीसाठी जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा…

Read More

सिंधुदुर्ग बँक विकास संस्थांना सक्षम करण्यासाठी काम करणार

आ.नितेश राणे;जिल्हा बँकेतर्फे १०० टक्के वसुली झालेल्या विकास संस्थांचा गौरव ⚡कणकवली ता.०५-: सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या वतीने ३० जून अखेरपर्यंत वसुलपात्र बॅक कर्जाची १०० टक्के वसुली केल्याबद्दल तालुक्यातील ३८ विकास संस्थांपैकी फोंडाघाट ,नाटळ , तळेरे,कलमठ, शिवडाव ,कलमठ , रामेश्वर विकास संस्था असलदे, आयनल, कोळोशी या विकास संस्थाचा गौरव आ.नितेश राणे,बँक अध्यक्ष मनीष दळवी यांच्या हस्ते…

Read More

श्री रामराज्य रथयात्रा बांदयात दाखल

ढोल ताशांच्या गजरात बांदा वासीयांनि केले स्वागत बांदा/प्रतिनिधीअयोध्या येथून सुरू झालेली श्री रामराज्य रथयात्रा आज सकाळी बांदा शहरात दाखल झाली. या रथयात्रेचे ढोल ताशांच्या गजरात व फटाक्यांच्या आतिषबाजीत जल्लोषात स्वागत करण्यात आले. यावेळी भाविकांनी रथाचे दर्शन घेतले. त्यानंतर रथयात्रेने गोवा म्हापसा येथे प्रयाण केले.अयोध्या येथून या रथ यात्रेची सुरुवात झाली. त्यानंतर विविध राज्यातील प्रवासानंतर ही…

Read More

उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून चंद्रकांत कासार आणि मायकल डिसोजा यांचा सत्कार….

⚡सावंतवाडी,ता.०५:-: चंद्रकांत कासार यांची ठाकरे गटाच्या उपजिल्हाप्रमुखपदी व सावंतवाडी तालुका संघटकपदी मायकल डिसोजा यांची निवड करण्यात आली. या दोघांचा शिवसेनेच्यावतीने सत्कार करण्यात आला. यावेळी जिल्हाप्रमुख संजय पडते, बाळा गावडे, तालुकाप्रमुख रुपेश राऊळ, खरेदी-विक्री संघाचे अध्यक्ष बाबुल ठाकूर, अरुण गावडे, रमेश गावकर, जॅकी डिसोजा आदी उपस्थित होते.

Read More

शिवाजी महाराज चौक मित्र मंडळाकडून डॉ. दुर्भाट यांचा सत्कार

⚡सावंतवाडी ता.०५-: राजा छत्रपती शिवाजी महाराज चौक मित्र मंडळ सावंतवाडी यांच्या वतीने उपजिल्हा रुग्णालय सावंतवाडीचे अधीक्षक डॉ. दुर्भाट यांचा सत्कार करण्यात आला. तसेच रुग्णपयोगिक वस्तू हॉस्पिटला भेट दिली. गेली 22 वर्षे डॉ. दुर्भाट चांगल्या प्रकारे रुग्ण सेवा बजावत आहे. जिल्हा मध्ये गोर गरिब रुग्णांचे कैवारी म्हणुन त्यांची ओळख आहे.आपल्या या रुग्ण सेवेत त्यांनी तीस हजार…

Read More

वायगंणतड येथे कोंबडी वाहतुक करणाऱ्या बोलेरो पिकअपला अपघात

चालक वाहक किरकोळ जखमी तर गाडीचे नुकसान : 140 नग कोंबडी मृत पावली ⚡दोडामार्ग ता.०५-:दोडामार्ग ते तिलारी विजघर राज्यमार्गावरिल वायगंणतड येथे बॉयलर कोंबडीची वाहतुक करत (एम एच 09सियु 3154) या वाहानारिंल चालकाचा ताबा सुटल्याने बोलेरो पिक अप गाडीला अपघात . हा प्रकार शनिवारी पहाटे 3:00च्या सुमारास घडला.यात चालक वाहक किरकोळ जखमी झाले.तर गाडीचे मोट्या प्रमाणात…

Read More
You cannot copy content of this page