मळगाव येथील रवळनाथ देवाचा ७ रोजी जत्रोत्सव*

⚡सावंतवाडी ता.०५सहदेव राऊळ- : मळगाव येथील पंचायतन श्री देव रवळनाथ देवाचा वार्षिक जत्रोत्सव ७ नोव्हेंबर रोजी साजरा होणार आहे.
यनिमित्त सकाळपासून मंदिरात धार्मिक कार्यक्रम, दुपारी महाप्रसाद, केळी-नारळ ठेवणे, नवस बोलणे-फेडणे आदी कार्यक्रम होणार आहेत. रात्री मंदिराभोवती पालखी प्रदक्षिणानंतर मळगाव येथील दशावतार मंडळाचा नाट्यप्रयोग होणार आहे. भाविकांनी या जत्रोत्सवाचा लाभ घ्यावा, असे आवाहन ग्रामस्थ व देवस्थान कमिटीने केले आहे.

You cannot copy content of this page