⚡सावंतवाडी ता.०५-: राजा छत्रपती शिवाजी महाराज चौक मित्र मंडळ सावंतवाडी यांच्या वतीने उपजिल्हा रुग्णालय सावंतवाडीचे अधीक्षक डॉ. दुर्भाट यांचा सत्कार करण्यात आला. तसेच रुग्णपयोगिक वस्तू हॉस्पिटला भेट दिली.
गेली 22 वर्षे डॉ. दुर्भाट चांगल्या प्रकारे रुग्ण सेवा बजावत आहे. जिल्हा मध्ये गोर गरिब रुग्णांचे कैवारी म्हणुन त्यांची ओळख आहे.
आपल्या या रुग्ण सेवेत त्यांनी तीस हजार हून अधिक महिलांच्या डिलेव्हरी यशस्वी रीत्या पार पडल्या.
अशा या त्यांच्या कार्याचे कौतुक होणे आवश्यक आहे म्हणून या मंडळाचे अध्यक्ष बंटी माठेकर, उपाध्यक्ष बंड्या तोरसकर ,विजय पवार, सचिव दिपक सावंत, सहसचिव महादेव राहु राहुल,संजय साळगावकर, अरुण घाडी, रत्नाकर माळी, उपस्थित होते.
