नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरपाई मिळावी
भाजपचे यशवंत माधव यांची मागणी : तातडीने कुजलेल्या भातपिकाचा पंचनामा करा ⚡सावंतवाडी ता.१८-: सावंतवाडी तालुक्यासह जिल्ह्यात गेले दहा-बारा दिवस परतीच्या पावसाने धुमशान घातले आहे. संध्याकाळच्या वेळी कोसळणाऱ्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास पाण्याखाली गेला. बहुतांश ठिकाणी भातपीक पाण्याखाली आले असून कापणी केलेले पीक कुजले. त्यामुळे शासन स्तरावरून नुकसान झालेल्या भातपिकाचा पंचनामा करून शेतकऱ्यांना भरपाई द्यावी…
