एसटी आणि टेम्पो ट्रॅव्हलर मध्ये अपघात

बांदा कॉर्नर येथील घटना;कोणालाही दुखापत नाही

बांदा/प्रतिनिधी
मुंबई -गोवा महामार्गवर बांदा कट्टा कॉर्नर चौकात एसटी बस व टेम्पो ट्रॅव्हलर यांच्यात समोरासमोर धडक बसून अपघात झाला. सुदैवाने या अपघातात कोणालाही दुखापत झाली नाही.
एसटी बस ही मालवण हून पणजीला जात होती. यावेळी एसटी बस चालकाने सर्कल न मारता गोव्याच्या दिशेने जातं होती. त्याचवेळी असल्याने अचानक ट्रॅव्हलर समोर आल्याने हा अपघात झाला. मात्र सुदैवाने कुणालाही दुखापत झाली नाही. यावेळी बांदा पोलिस घटनास्थळी दाखल झाले आहेत. तसेच स्थानिकांनी देखील अपघातस्थळी गर्दी केली होती.
. याठिकाणी उड्डाणपूल मंजूर असून अपघात टाळण्यासाठी लवकरात लवकर काम होणे गरजेचे असल्याचे स्थानिकांनी सांगितले.

You cannot copy content of this page