बांदा शहर मर्यादित किल्ले स्पर्धा

सिंधुदुर्ग जिल्हा ज्येष्ठ नागरिक संघ बांदा तर्फे आयोजन

⚡बांदा ता.१८-: सिंधुदुर्ग जिल्हा ज्येष्ठ नागरिक संघ बांदा तर्फे दरवर्षीप्रमाणेच दिवाळी निमित्त बांदा शहर मर्यादित किल्ले स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. सदर स्पर्धा पंधरा वर्षांखालील मुलामुलींसाठीच आयोजित करण्यात आली आहे.

कोणत्याही किल्ल्याची पर्यावरण पूरक साहित्य वापरून प्रतिकृती तयार करावयाची आहे. स्पर्धेतील प्रथम पारितोषिक रुपये १०००, द्वितीय रुपये ७५० व तृतीय रुपये ५०० प्रशस्तीपत्र व सन्मानचिन्ह देण्यात येणार आहे. तसेच उत्तेजनार्थ पारितोषिक रोख रुपये २०० प्रशस्तीपत्र व सन्मानचिन्ह देण्यात येणार आहे. स्पर्धेचे परीक्षण २७ व २८ ऑक्टोबर रोजी करण्यात येणार आहे.
इच्छुकांनी आपली नोंदणी जगन्नाथ सातोसकर, तुळशीदास धामापूरकर गुरुनाथ नार्वेकर यांचेकडे दिनांक २४ ऑक्टोबरपर्यंत मोबाईल नंबर सह करावी, असे आवाहन ज्येष्ठ नागरिक संघ बांदा तर्फे करण्यात आले आहे.

You cannot copy content of this page