कापडी पिशव्या बनविणे, मसाले निर्मिती, फॅशन डिझाईन प्रशिक्षणाचे आयोजन
पंधरावा वित्त आयोग अंतर्गत बांदा ग्राम पंचायतचा उपक्रम बांदा/प्रतिनिधीबांदा ग्रामपंचायतीचे वतीने १५ वा वित्त आयोग अंतर्गत पर्यावरणपूरक कापडी पिशव्या तयार करणे, मसाले निर्मिती व फॅशन डिझायनिंग ह्या प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. प्रशिक्षण शिबिराचे उदघाटन ग्रामविस्तार अधिकारी लीला मोर्ये यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी महिलांनी सुंदर व आकर्षक पिशव्या बनविल्या.सदर प्रशिक्षण कार्यक्रम ग्रामपंचायत बांदा…
