माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंती निमित्त विविध स्पर्धा

२५ रोजी वाजपेयी उद्यान आणि बांदा शहर भाजपचे आयोजन

बांदा/प्रतिनिधी
भारताचे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या ९८ व्या जयंती निमित्त अटलबिहारी वाजपेयी उद्यान, बांदा येथे भारतीय जनता पार्टी बांदा शहर तर्फे रविवार दिनांक २५ रोजी दुपारी ४ वाजता रंगभरण आणि खुल्या चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
रंगभरण स्पर्धा पहिला गट – बालवाडी ते इयत्ता दुसरी, दुसरा गट – इयत्ता तिसरी ते पाचवी. तिसरा गट – इयत्ता सहावी ते आठवी. चित्रकला स्पर्धा- इयत्ता नववी ते खुला गट (वयोमर्यादा नाही). चित्रकला स्पर्धेसाठी ‘अटल बिहारी वाजपेयी यांचे पोट्रेट’ व ‘भारतीय सण’ हे विषय ठेवण्यात आले आहेत. सहभागी होणाऱ्या सर्व स्पर्धकांना प्रशस्तीपत्रक देण्यात येणार आहे. रंगभरण स्पर्धेतील स्पर्धकांनी आपले रंग आणायचे आहेत. रंगभरण स्पर्धेतील प्रथम तीन क्रमांक विजेत्यांना रोख ५००, ३००, २०० रुपयांचे पारितोषिक देण्यात येणार आहे.
चित्रकला स्पर्धेतील प्रथम तीन क्रमांक विजेत्यांना रोख १०००, ७००, ५०० रुपयांचे पारितोषिक देण्यात येणार आहे. अधिक माहितीसाठी केदार- ९४२२३९४०७५ किंवा बाबा- ९८२३६६११३३ यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

You cannot copy content of this page