Headlines

कणकवलीतील पटकीदेवी मातेचा वार्षिक जत्रोत्सव उत्साहात

ओटी भरण्यासाठी व दर्शनासाठी लागली रांग ⚡कणकवली ता.१७-:कणकवली शहरातील पटकीदेवी मातेचा जत्रोत्सव मंगळवारी उत्साहात साजरा करण्यात आला.मंदिराला विद्युत रोषणाई तसेच फुलांची सजावट करण्यात आली होती. ओटी भरण्यासाठी व दर्शनासाठी मंदिर परिसरात लांबच लांब रांग लागली होती.गावराठीच्या या मंदिरात सकाळी विधिवत पूजन करण्यात आले.श्री.देव रवळनाथ मंदिरात मानकरी एकत्र होवून तेथून परडी (काकडा)पेटवून वाजत गाजत पटकीदेवी मंदिरात…

Read More

उद्योगपती चंद्रकांत सदडेकर यांचे मुंबईत निधन

⚡कणकवली ता.१७-: भिरवंडे गावचे सुपुत्र, मुंबईतील प्रतिथयश उद्योगपती चंद्रकांत नारायण सदडेकर (73) यांचे मंगळवारी मुंबईत दादर येथील निवासस्थानी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या अकाली निधनाने भिरवंडे गावावर शोककळा पसरली आहे. प्रतिकूल परिस्थितीवर मात करत शून्यातून विश्व निर्माण करणार्‍या एका हरहुन्नरी, अभ्यासू आणि मनमिळावू व्यक्तिमत्वाची अकाली एक्झीट सर्वांनाच चटका लावणारी आहे अशा शब्दांत त्यांच्या निधनाबद्दल विविध…

Read More

बी एस एन एल ची चांगली सेवा देवू

ग्रामपंचायतींच्या समस्या सोडवू;दूरसंचार महाप्रबंधक अरविंद पाटील यांचे ग्राहक मेळाव्यात आश्वासन ⚡सावंतवाडी ता.१७-: जिल्ह्यातील बीएसएनएलच्या ग्राहकांना चांगली सेवा देण्याचा प्रयत्न केला जाईल तसेच ज्या ग्राहक, ग्रामपंचायतीच्या तक्रारी असतील त्या पुढील एका महिन्यात निपटारा केला जाईल असे आश्वासन दूरसंचार महाप्रबंधक अरविंद पाटील यांनी ग्राहक मेळाव्यात दिले. बीएसएनएल सिंधुदुर्ग आयोजित सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी महासंघ, सिंधुदुर्ग यांच्या सहकार्याने जिल्हास्तरीय…

Read More

जोखीम कालावधी संपण्यापूर्वीच बांदा नेतर्डे रस्ता खड्डेमय

तात्काळ दुरुस्तीची महाराष्ट्र रस्ते विकासकडे ग्राम पंचायतची मागणी बांदा/प्रतिनिधीजोखीम कालावधी संपण्यापूर्वीच बांदा-नेतर्डे रस्त्यावर खड्ड्याचे साम्राज्य पसरले असून या रस्त्याची तात्काळ डागडुजी करावी अशी लेखी मागणी बांदा ग्रामपंचायतच्या वतीने महाराष्ट्र रस्ते विकासच्या कार्यकारी अभियंता यांच्याकडे करण्यात आली आहे. येत्या १५ दिवसात खड्डे न बुजविल्यास प्रसंगी जनआंदोलन उभारण्यात येईल असा इशारा उपसरपंच जावेद खतीब यांनी दिला आहे.निवेदनात…

Read More

पडवे माजगाव येथे शेतकरी मेळावा संपन्न

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य विकास कार्यक्रमाअंतर्गत आयोजन बांदा/प्रतिनिधीपडवे माजगाव येथे आज आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य विकास कार्यक्रमांतर्गत शेतकरी जनजागृती, किसान क्रेडीट कार्ड, काजू मोहोर व पिक संरक्षण असा तिहेरी उद्देश ठेऊन मंडळ कृषि अधिकारी बांदा व ग्रामपंचायत पडवे माजगाव यांच्या संयुक्त विद्यमाने शेतकरी मेळावा संपन्न झाला.यावेळी तालुका कृषी अधिकारी श्री बनकर यांनी पौष्टिक तृणधान्य, पिकांचा आहारातील महत्त्व…

Read More

कणकवली टेंबवाडीतील भाग्यवंती देवीचा १९ जानेवारीला जत्रोत्सव

⚡कणकवली ता.१७-: कणकवली -टेंबवाडीतील विजापूरवासिंय भक्तांची नवसाला पावणारी देवी म्हणून नावारूपास आलेल्या श्री भाग्यवंती देवीचा जत्रोत्सव गुरुवार १९ जानेवारीला होत आहे. या जत्रोत्सवाला कर्नाटकातील विजापूर आदी परिसरातून मोलमजुरीसाठी सिंधुदुर्ग-रत्नागिरी जिल्हांत आलेल्या हजारो भाविकांची गर्दी असते. यंदाचा हा १९ सावा जत्रोत्सव आहे. टेंबवाडीतील रामचंद्र शामसुंदर राणे उभयताचा नवस पुर्ण झाल्याने त्यांनी मंदिरासाठी जमीन दिली. भाविकांनी संघटितपणे…

Read More

कणकवली पत्रकार संघाचा २१ रोजी बक्षीस, पुरस्कार वितरण समारंभ

⚡कणकवली ता.१७-: कणकवली तालुका पत्रकार समितीच्यावतीने दरवर्षी देण्यात येणारा पत्रकार, उद्योजक व सामाजिक कार्यकर्ता पुरस्कार तसेच निबंध स्पर्धेतील विजेत्यांचे बक्षीस वितरण समारंभ शनिवार २१ जानेवारी रोजी सकाळी ११ वा. कणकवली कॉलेजच्या एचपीसीएल सभागृहात होणार आहे. यावेळी आमदार नीतेश राणे, शिक्षण प्रसारक मंडळ कणकवलीच्या चेअरमन डॉ. राजश्री साळुंखे, नगराध्यक्ष समीर नलावडे, माजी आमदार परशुराम उपरकर, नगर…

Read More

नांदगाव येथील किशोर मोरजकर ट्रस्टच्या वक्तृत्व स्पर्धेचे पारितोषिक वितरण

⚡कणकवली ता.१७-: कणकवली तालुक्यातील नांदगाव येथील किशोर मोरजकर चॅरिटेबल ट्रस्टच्या चौथ्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून नांदगाव येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यात गाव मर्यादित आँनलाईन वक्तृत्व स्पर्धा “माझ्या स्वप्नातील गाव”या विषयावर आयोजित करण्यात आलेल्या स्पर्धेत प्रथम-वैदेही पारकर-नांदगाव मधली,द्वितीय-सलोनी शेलार-ओटव नांदगावतर उत्तेजनार्थ-१)सान्वी सुनिल महाडेश्वर ,२)रुद्र बांदिवडेकरयांना रोख रक्कम व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले आहे.तसेच…

Read More

बोर्डवे युवासेना शाखाप्रमुख पदी युवानेते स्वप्निल ऊर्फ भैया शिंदे यांची नियुक्ती

आमदार वैभव नाईक यांच्या हस्ते नियुक्ती जाहीर ⚡कणकवली ता.१७-: शिवसेना जिल्हाप्रमुख आमदार वैभव नाईक यांच्या हस्ते आज बोर्डवे युवासेना शाखाप्रमुख पदी युवानेते कु.स्वप्निल ऊर्फ भैया सुरेश शिंदे यांची नियुक्ती करण्यात आली. यावेळी आमदार वैभव नाईक यांनी त्यांना भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. तसेच बोर्डवे गावच्या विकासासाठी शिवसेना नेहमीच कटिबद्ध राहणार असल्याचे आश्वासन यावेळी आमदार वैभव नाईक…

Read More

बांद्यात स्मशानभूमीची श्रमदानाने साफसफाई

सामाजिक कार्यकर्ते अर्णव स्वार व साईप्रसाद काणेकर मित्रमंडळाचा पुढाकार बांदा/प्रतिनिधीसामाजिक कार्यकर्ते अर्णव स्वार व साईप्रसाद काणेकर मित्रमंडळाच्या वतीने आज येथील स्मशानभूमी व परिसराची श्रमदानाने साफसफाई करण्यात आली. सामाजिक कार्याचे कौतुक होत आहे.यावेळी अर्णव स्वार, ग्रामपंचायत सदस्य साईप्रसाद काणेकर, ओंकार नाडकर्णी, निखिल मयेकर, प्रथमेश गोवेकर, समीर सातार्डेकर, दीनानाथ देसाई, भाऊ वाळके, नागेश बांदेकर, बिपीन येडवे, अजिंक्य…

Read More
You cannot copy content of this page