ग्रामपंचायतींच्या समस्या सोडवू;दूरसंचार महाप्रबंधक अरविंद पाटील यांचे ग्राहक मेळाव्यात आश्वासन
⚡सावंतवाडी ता.१७-: जिल्ह्यातील बीएसएनएलच्या ग्राहकांना चांगली सेवा देण्याचा प्रयत्न केला जाईल तसेच ज्या ग्राहक, ग्रामपंचायतीच्या तक्रारी असतील त्या पुढील एका महिन्यात निपटारा केला जाईल असे आश्वासन दूरसंचार महाप्रबंधक अरविंद पाटील यांनी ग्राहक मेळाव्यात दिले.
बीएसएनएल सिंधुदुर्ग आयोजित सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी महासंघ, सिंधुदुर्ग यांच्या सहकार्याने जिल्हास्तरीय बीएसएनएलचा ग्राहक मेळावा आज टेलिफोन भवन, सावंतवाडी येथे संपन्न झाला.
यावेळी अरविंद पाटील बोलत होते.
यावेळी जिल्हा व्यापारी संघाचे अध्यक्ष प्रसाद पारकर, जिल्हा प्रबंधक रविकरण जन्नू, व्यापारी संघाचे नंदन वेंगुर्लेकर, ग्राहक संरक्षण चे अँड नकुल पार्सेकर, अँड संजू शिरोडकर,दिलीप भालेकर, राजेश पनवेलकर, प्रसाद आरविंदेकर, बीएसएनएलचे व्हि एन कुलकर्णी, सुधीर देशमुख मान्यवर उपस्थित होते.
