Headlines

*सिंधुदुर्गातील पहिल्या ज्युनिअर ट्रायथलॉन चॅम्पियनशिपला उत्स्फूर्त प्रतिसाद…

भोसले सैनिक स्कूलचे आयोजन.. ⚡सावंतवाडी ता.०१-: सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रथमच आयोजित करण्यात आलेल्या ज्युनिअर ट्रायथलॉन चॅम्पियनशिप २०२६ ला विद्यार्थी, पालक आणि क्रीडाप्रेमींकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. भोसले नॉलेज सिटी येथे पार पडलेल्या या स्पर्धेत सिंधुदुर्ग जिल्ह्यासह गोवा राज्यातील अनेक विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवून स्पर्धेची रंगत वाढवली._ रनिंग, सायकलिंग आणि रायफल शूटिंग या तीन क्रीडा प्रकारांचा समावेश असलेल्या या…

Read Full News

जनगणना २०२७ च्या कामकाज पाहणीसाठी जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे फिल्डवर…

एकही घर वगळलं जाणार नाही याची काळजी घेण्याचे आवाहन.. ⚡कुडाळ ता.०१-: जनगणना २०२७ अंतर्गत सुरू असलेल्या टप्पा- १ मधील घरगणना आणि घरयादी तयार करण्याच्या कामकाजाचा आढावा घेण्यासाठी सिंधुदुर्गच्या जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे आज प्रत्यक्ष फिल्डवर उतरल्या. आज त्यांनी यांनी कुडाळ तालुक्यात पिंगुळी गावात देऊळवाडी परिसराला भेट देऊन प्रत्यक्ष क्षेत्रीय पाहणी केली. या भेटीदरम्यान त्यांनी जनगणना प्रक्रियेतील…

Read Full News

सिंधुदुर्ग जिल्हा सहकारी मंडळाला जिल्हा बँकेचे नेहमी सहकार्य राहील…

मनीष दळवी: ओरस येथील नूतन कार्यालयाचे उद्घाटन उत्साहात संपन्न .. ⚡सिंधुदुर्गनगरी ता.०१-: सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या माध्यमातून सिंधुदुर्ग जिल्हा सहकारी मंडळाला प्रशिक्षणाबाबत अधिक सहकार्य केले जाईल जेणेकरून सहकारी चळवळ अधिक गतीमानसाठी होण्यासाठी मदत होईल तसेच सहकारी मंडळाला जिल्हा बँकेचे नेहमीच सहकार्य मिळेल असे प्रतिपादन सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी यांनी सिंधुदुर्ग जिल्हा सहकारी मंडळ सिंधुदुर्ग…

Read Full News

वैभव नाईक यांनी निलेश राणेंवरील आरोप थांबवावे…

अरविंद करलकर :भावांच्या प्रगतीमुळे वैभव नाईकांना पोटशूळ;शिंदे सेनेची जोरदार टीका.. ⚡कुडाळ ता.०१-: माजी आमदार वैभव नाईक यांनी आमदार निलेश राणे यांच्यावरील आरोप तातडीने थांबवावेत, तसेच त्यांच्या दोन्ही बंधूनी नगरसेवक पदाचे राजीनामे द्यावेत, अशी ठोस मागणी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख अरविंद करलकर यांनी केली आहे. खरं तर वैभव नाईक यांनी राजन तेली यांचे पाय धरले पाहिजेत, कारण त्यांच्याच…

Read Full News

लोकांच्या प्रश्नासाठी आंदोलन करायचेच नाही का…

राजन नाईक:शिवसेना शिंदे गट महागाईचे समर्थन करतोय का..? ⚡कुडाळ ता.०१-: माजी आमदार वैभव नाईक यांनी २७ मे रोजी महागाई विरोधात केलेल्या आंदोलनावरून आता कुडाळमधील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. या आंदोलनाविरोधात शिवसेना (शिंदे गट) तालुकाप्रमुख यांनी पोलिसांना दिलेल्या पत्रामुळे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. असा आरोप ठाकरे सेना तालुका प्रमुख राजन नाईक यांनी केला आहे….

Read Full News

कुडाळात भूजल पातळी वाढविण्यासाठी वृक्षारोपण मोहीम…

ठाकरे सेना आणि युवसेनेचा उपक्रम:आदित्य ठाकरेंच्या वाढदिवसाच औचित्य.. ⚡कुडाळ ता.०१-: घटत चाललेली भूजल पातळी आणि भविष्यात उदभवणारा पाणी टंचाईचा धोका ओळखून ठाकरे सेना आणि युवा सेना कुडाळ शहरात आगळावेगळा उपक्रम राबविणार आहेत. भूजल पातळी वाढवुन ती टिकवून ठेवणारी सुमारे ५ हजार झाडं शहरातील घराघरात शिवसैनिक स्वतः येऊन लावून देणार आहेत. युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे…

Read Full News

धनगर समाजाच्या पारंपरिक नृत्य कलेचा सिंधुदुर्ग महोत्सव लवकरच…

विचार मंचाच्या सभेत एकमुखी ठराव.. ⚡वैभववाडी ता.०१-: धनगर समाज विचार मंच सिंधुदुर्ग यांच्यावतीने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील धनगर समाजाच्या पारंपारिक नृत्य कलाचा सिंधुदुर्ग महोत्सव येत्या काही महिन्याभरात भरवणार असल्याचा एकमुखी ठराव सर्वसाधारण सभेत घेण्यात आला.पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची 301 जयंती मोठ्या उत्साहात संपन्न झाल्यानंतर माध्यमिक व उच्च माध्यमिक पतसंस्था सभागृहात विचार मंच सिंधुदुर्ग जिल्ह्याची सर्वसाधारण सभा…

Read Full News

देवगड आगाराच्या चंदन फोंडके यांना ‘लालपरी गौरवरत्न पुरस्काराने सन्मानित…

⚡देवगड ता.०१-:महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या सेवेत उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल देवगड आगाराचे चालक तथा वाहक चंदन सुरेश फोंडके यांना मुंबई येथील मध्यवर्ती कार्यालयात ‘लालपरी गौरवरत्न पुरस्कार’ प्रदान करून गौरविण्यात आले. प्रामाणिक सेवा, समाजाभिमुख कार्य, उत्कृष्ट उत्पन्नवाढ, प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी घेतलेली दक्षता तसेच प्रसंगावधान राखून केलेल्या उल्लेखनीय कामगिरीची दखल घेत हा प्रतिष्ठेचा पुरस्कार देण्यात आला. महाराष्ट्र राज्य…

Read Full News

मालवणमधील ट्रॅव्हल व्यावसायिक रुपेश कुर्ले याची गळफास घेऊन आत्महत्या…

⚡मालवण ता.०१-:मालवण वायरी भूतनाथ येथे एका भाड्याच्या खोलीत एकटाच राहणाऱ्या ट्रॅव्हल व्यावसायिक रुपेश विष्णू कुरले (वय ३९, मूळ रा. सर्जेकोट, मालवण; सध्या रा. वायरी भूतनाथ, मालवण) याने बेडशीटच्या साहाय्याने छताच्या पंख्याला गळफास लावून आत्महत्या केली. या घटनेमुळे मालवणात हळहळ व्यक्त होत आहे. याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, रुपेश कुर्ले हा गेल्या १० वर्षांपासून वायरी भूतनाथ येथे…

Read Full News

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती उत्साहात साजरी…

⚡वैभववाडी ता.०१-: धनगर समाज विचारमंच सिंधुदुर्ग यांच्या वतीने ओरस सिंधुदुर्ग येथे पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून जयंती साजरी करण्यात आली.यावेळी विचार मंचचे अध्यक्ष एकनाथ जानकर,माजी पोलिस उपनिरीक्षक बापु खरात,भवन समिती अध्यक्ष कानु शेळके,माजी गटविकास अधिकारी आर डी जंगले,माजी नायबतहसीलदार गंगाराम कोकरे, विठ्ठल खरात नवलराज काळे,पांडूरंग काळे,देऊ जंगले, लक्ष्मण शेळके, संतोष साळसकर,…

Read Full News

You cannot copy content of this page