Headlines

मळगाव येथे सकल हिंदू संमेलन मोठ्या उत्साहात संपन्न…

⚡सावंतवाडी ता.०२-: मळगाव येथील शालू मंगल कार्यालय येथे रविवारी ३१ मे रोजी सकल हिंदू संमेलन मोठ्या उत्साहात पार पडले. दीपप्रज्वलन करून शिवप्रतिमेस व भारत मातेच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. या प्रसंगी प्रमुख वक्ते सिंधुमित्र सेवा सहयोग प्रतिष्टानचे अध्यक्ष डॉ. प्रवीणकुमार ठाकरे, प्रमुख अतिथी सिंधुदुर्ग जिल्हा वारकरी संप्रदायचे अध्यक्ष ह. भ. प. श्री…

Read Full News

फ्लाय९१ कडून प्रवाशांसाठी विशेष ‘स्मार्टबॅग९१’ सेवा…

⚡कुडाळ ता.०२-: फ्लाय९१ ह्या प्रादेशिक विमान सेवेने ‘स्मार्टबॅग९१ ही नवीन ग्राहक-केंद्रित सेवा सुरू केली आहे. प्रवाशांसाठी अतिरिक्त सामानाची प्रक्रिया अधिकसोपी, पारदर्शक, त्रासमुक्त आणि परवडणारी करण्याच्या उद्देशाने हे सेवा सुरु करण्यात आली आहे.या संदर्भात प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे, या सेवेअंतर्गत आता फ्लाय९१ कोणत्याही मार्गावर आगाऊ अतिरिक्त सामान अत्यंत सवलतीच्या दरात बुक करता येणार आहे. ही…

Read Full News

सिंधुदुर्गात प्रथम बालस्नेही पंचायत ठरली पाडलोस…

मडुरा पंचायत द्वितीय तर वैभववाडी तालुक्यातील कुसुर पंचायत तृतीय; राज्यात आदर्श गाव म्हणून पाडलोसची वाटचाल.. ⚡बांदा ता.०२-:महाराष्ट्रातील तब्बल २७ हजार ९५१ ग्रामपंचायतींपैकी केवळ १०२ ग्रामपंचायतींची ‘बालस्नेही पंचायत’ म्हणून निवड करण्यात आली असून त्यामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तीन ग्रामपंचायतींनी मानाचे स्थान पटकावले आहे. विशेष म्हणजे सावंतवाडी तालुक्यातील पाडलोस ग्रामपंचायतीने जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळवत राज्यस्तरावरही आपली वेगळी ओळख…

Read Full News

बांदा ग्रामपंचायतीला कायमस्वरूपी ग्रामसेवक कधी..?

नागरिकांत तीव्र नाराजी: आंदोलनाचा दिला इशारा… ⚡बांदा ता.०२-: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आर्थिकदृष्ट्या सक्षम आणि मोठ्या ग्रामपंचायतींपैकी एक असलेल्या बांदा ग्रामपंचायतीला अद्याप कायमस्वरूपी ग्रामसेवक मिळालेला नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. याबाबत बांदा येथील वासुदेव भोगले यांनी गटविकास अधिकाऱ्यांकडे निवेदन सादर करून तातडीने नियमित ग्रामसेवकाची नियुक्ती करण्याची मागणी केली आहे.निवेदनात म्हटले आहे की, बांदा ग्रामपंचायतीमध्ये नियमित…

Read Full News

इन्सुली सर्विस रोडवर वाढला अपघाताचा धोका…

रंबलिंग पट्ट्यांसह सुरक्षा उपाययोजनांची नितीन राऊळ यांची मागणी. ⚡बांदा ता.०२-: जुन्या मुंबई – गोवा राष्ट्रीय महामार्गवरील संत सोहिरोबानाथ मंदिर ते इन्सुली हायस्कूल दरम्यान दोन्ही बाजूकडील सर्विस रोडवर वाहनांची प्रचंड वर्दळ असते. या ठिकाणी वाहने भरधाव वेगाने धावत असल्याने अपघातांचा धोका वाढला असून प्रत्यक्षात अनेक अपघात घडलेही आहेत. त्यामुळे या ठिकाणी तत्काळ रंबलिंग पट्टे व इतर…

Read Full News

आमदारकीचा केसरकरांनी राजीनामा द्यावा…

कॉग्रेसची मागणी: मतदार संघातील जनतेला विकासाऐवजी केवळ दिले पोकळ आश्वासने.. सावंतवाडी : सावंतवाडीत कॉग्रेस जिल्हाध्यक्ष अरविंद मोंडकर यांच्या उपस्थितीत विधानसभा निहाय बैठक येथे काँग्रेस कार्यालय, सावंतवाडी येथे पार पडली. ऐतिहासिक सावंतवाडी मतदारसंघाचे रूप भकास करत फक्त आश्वासन देणारे आमदार दीपक केसरकर यांनी आपला तात्काळ राजीनामा द्यावा अशी मागणी त्यांनी यावेळी केली. यावेळी अवैध मायनिंग माफिया,…

Read Full News

छप्पर हरवलेल्या माऊलीला विशाल परब यांचा मदतीचा हात…

⚡बांदा, ता.२-: डोक्यावर छप्पर नाही, घरात कमावता माणूस नाही, सोबतीला गंभीर आजार आणि तोंडावर आलेला पावसाळा… अशा अत्यंत विदारक परिस्थितीत इन्सुली पागावाडी येथील वृद्ध विधवा माता आणि तिचा आजारी मुलगा जीवन जगत आहेत. या हतबल कुटुंबाच्या मदतीला भाजप युवा नेते विशाल परब धावून आल्याने या कुटुंबाला मोठा आधार मिळाला आहे.इन्सुली पागावाडी येथील श्रीमती जनाबाई धोंडू…

Read Full News

सावंतवाडी रोड रेल्वे स्टेशनसमोर भीषण अपघात; दोन तरुण जखमी…

⚡सावंतवाडी ता.०२-:सावंतवाडी रोड रेल्वे स्टेशनच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर दुचाकी आणि कारमध्ये झालेल्या अत्यंत भीषण अपघातात मळेवाड येथील दोन तरुण गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात आज दुपारी १२.३० वाजण्याच्या सुमारास घडला. अपघातातील गंभीर जखमींनवर सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचारानंतर पुढील उपचारासाठी गोव्यातील खासगी रुग्णालयात हलविण्यात आले आहे.​या अपघातात पल्सर दुचाकी चालक यश नंदकिशोर नाईक (वय १९,…

Read Full News

शासकीय मैदानाची अखेर नगर पंचायतकडून सफाई…

मंदार शिरसाट यांच्याच प्रभागात अस्वच्छता :गटनेता विलास कुडाळकर यांनी वेधले लक्ष.. कुडाळ : येथील तहसील कार्यालयाच्या शेजारी असलेल्या शासकीय मैदानामधील दारूच्या बाटल्यांचा खच अखेर कुडाळ नगर पंचायतीने या परिसराची स्वच्छता केली आहे. परिसरातील स्वच्छता कुडाळ नगरपंचायतीमार्फत करण्यात आली आहे. दरम्यान नगरसेवक मंदार शिरसाट यांच्या प्रभागात हे मैदान येत असल्याने त्या ठिकाणी त्यांनी लक्ष घालून जबाबदारी…

Read Full News

भोसले इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीचे अधिव्याख्याता सचिन लांजेकर यांना मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये डॉक्टरेट…

ऑटोमोबाईल रेडिएटरमधील संशोधनाबद्दल संस्थेकडून विशेष गौरव… ⚡सावंतवाडी ता.०२-: यशवंतराव भोसले इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या डिप्लोमा मेकॅनिकल विभागाचे अधिव्याख्याता सचिन सुनील लांजेकर यांनी मेकॅनिकल इंजिनिअरिंगमधील ‘हीट ट्रान्सफर’ विषयात पीएचडी संपादन केली आहे. कोल्हापूर येथील संजय घोडावत युनिव्हर्सिटीतून त्यांनी ऑटोमोबाईल रेडिएटरमध्ये नॅनोपार्टिक्युलेट बायनरी फ्लुइडच्या सहाय्याने उष्णता हस्तांतरण वाढविणे या विषयावर संशोधन पूर्ण केले._ या संशोधनाचा उपयोग वाहनांच्या रेडिएटरची…

Read Full News

You cannot copy content of this page