Headlines

कला क्षेत्रात चिंदर गावातील विद्यार्थ्यांनी नावलौकिक मिळवावा…

गणेश अपराज:चिंदरमधील गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा संपन्न.. ⚡मालवण ता.१२-:स्वतःची आवड, क्षमता आणि भविष्यातील संधी यांचा ताळमेळ साधून विद्यार्थ्यांनी आपल्या भविष्यातील क्षेत्राची निवड करावी. फक्त इतरांचे अनुकरण न करता, स्वतःचे व्यक्तिमत्त्व आणि मूल्ये ओळखून निर्णय घेतल्यास करिअरमध्ये आनंद आणि यश दोन्ही मिळतात. कला क्षेत्रात काम करण्यासाठी सध्या पेंटर पासून मोठ्या आर्टीस्ट पर्यंत खूप संधी उपलब्ध असून…

Read Full News

कोळंब येथे १४ रोजी ‘फार्मर आयडी’ शिबीर..

⚡मालवण ता.१२-:कोळंब तलाठी कार्यालय यांच्यावतीने शेतकरी ओळखपत्र (Farmer ID Card) काढण्यासाठी रविवार दि. १४ जून रोजी विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. सदर शिबीर ग्राम महसूल अधिकारी कार्यालय, कोळंबं येथे सकाळी १० ते सायंकाळी ४ या वेळेत आयोजित करण्यात आले आहे. कोळंब तलाठी सजामधील महसुली गावांतील ज्या शेतकऱ्यांची शेतकरी ओळखपत्रासाठी नोंदणी अद्याप शिल्लक आहे, त्यांनी…

Read Full News

आरोंदा येथे २० रोजी दहावीतील यशस्वी विद्यार्थ्यांचा वार्षिक गुणगौरव समारंभ…

⚡सावंतवाडी ता.१२-: मोहन भोगले प्रतिष्ठान ,आरोंदा यांच्या वतीने मार्च २०२६ मधील यशस्वी झालेल्या दहावीतील विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभ २० जून रोजी सायंकाळी ठीक ४.३० वा.आरोंदा ग्रामोन्नती मंडळाच्या सभागृहात आयोजित करण्यात आला आहे. या समारंभात विविध मान्यवरांच्या उपस्थितीत यशस्वी विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्यात येणार असून,या समारंभात देण्यात येणारे पुरस्कार पुढील प्रमाणे:-डॉ. पी. वाय. नाईक पुरस्कृत पत्नी स्व. सौ….

Read Full News

बिळवसच्या श्री देवी सातेरी जलमंदिरचा २६ जुलै रोजी आषाढी जत्रोत्सव…

⚡मालवण ता.१२-:भक्ताच्या हाकेला व नवसाला पावणारी देवी म्हणून सर्व दूरवर ख्याती असलेली सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण बिळवस  येथील श्री देवी सातेरी जलमंदिरचा आषाढ महिन्यात होणारा सातेरीचा जत्रोत्सव यावर्षी रविवार दि. २६ जुलै रोजी होणार असल्याची माहिती सातेरी देवस्थानच्या वतीने देण्यात आली. संपूर्ण कोकणात आषाढ महिन्यात होणारी ही एकमेव जत्रा म्हणून या बिळवस श्री सातेरी देवी जलमंदिरची ख्याती आहे….

Read Full News

माझा सिंधुदुर्गतर्फे विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती व शैक्षणिक साहित्याचे वितरण…

⚡मालवण ता.१२-:माझा सिंधुदुर्ग विकास संस्था (रजि.) व संलग्न माझा सिंधुदुर्ग ग्रुप यांच्यावतीने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आई / वडिलांचे छत्र गमावलेल्या व प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण घेणाऱ्या शालेय विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आधार देण्याच्या उद्देशाने शिष्यवृत्ती उपक्रमांतर्गत संपूर्ण वर्षासाठी लागणारे शैक्षणिक साहित्य वितरण कार्यक्रम नुकताच मराठा समाज सभागृह, कुडाळ येथे संपन्न झाला. या उपक्रमाचे हे ६ वे वर्ष होते. यावेळी…

Read Full News

जिल्ह्यातील महिला औद्योगिक संस्थांना सक्षम करून नवीन व्यवसाय निर्मितीस चालना देण्याचा आमचा प्रयत्न…

मनिष दळवी:सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बहुउद्देशीय महिला औद्योगिक संस्थांना ‘इंडस्ट्री’ म्हणून ओळख मिळवून देण्यासाठी जिल्हा बँकेत बैठक संपन्न…* ⚡सिंधुदुर्गानगरी ता.१२-: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बहुउद्देशीय महिला औद्योगिक संस्थांच्या महिला पदाधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सभागृहात पार पडली. जिल्ह्यातील औद्योगिक संस्थांना सक्षम करून नवीन व्यवसाय निर्मितीस चालना देण्याच्या उद्देशाने ही प्राथमिक बैठक आयोजित करण्यात आली होती. या…

Read Full News

धाकोरे ग्रामपंचायतीच्या वतीने ‘एक दाखला, एक वृक्ष’ स्तुत्य उपक्रम…

⚡सावंतवाडी ता.१२-: फक्त शासकीय दाखले देणे हाच उद्देश न ठेवता, गावातील प्रत्येक घरात पर्यावरण संवर्धनाचा संदेश पोहोचावा या मुख्य हेतूने धाकोरे ग्रामपंचायतीने निसर्गाच्या दृष्टीने एक चांगला निर्णय घेत सामाजिक दृष्टीने पाऊल उचलले आहे. गावात ‘एक दाखला, एक वृक्ष’ या अभिनव नियमाची अंमलबजावणी अत्यंत उत्साहात सुरू करण्यात आली. आता ग्रामस्थांना कोणताही शासकीय दाखला हवा असल्यास आधी…

Read Full News

मळेवाड येथील “तो” खड्डा बुजणार तरी कधी…?

ग्रामस्थांचा सवाल: लवकरात लवकर बुजवण्याची होत आहे मागणी.. ⚡सावंतवाडी ता.१२-: मळेवाड येथील “तो” खड्डा बुजणार तरी कधी? असा संतप्त सवाल ग्रामस्थांनी ,वाहनधारकांनी केला असून,या मोठ्या खड्ड्यात पावसाचे पाणी साचून एखादी दुर्घटना घडण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.त्यामुळे हा खड्डा लवकरात लवकर बुजवण्याची मागणी आता होत आहे. सावंतवाडी ते मळेवाड या मुख्य रस्त्यावरील मळेवाड येथील श्री…

Read Full News

झाराप रेल्वे स्टेशनवरून खनिज माती वाहतुकीवरून संशय…

अवैध मायनिंगची चौकशी करण्याची वैभव नाईक, परशुराम उपरकर व पर्यावरण कार्यकर्त्यांची मागणी :जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर.. ⚡सिंधुदुर्ग दि.१२-: झाराप रेल्वे स्टेशनवरून मोठ्या प्रमाणावर होत असलेल्या खनिज माती वाहतुकी संदर्भात व अवैध मायनिंग संदर्भात जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले. कुठल्याही शासकीय, प्रशासकीय परवानग्या न घेता होत असलेला हा अवैध मायनिंग उद्योग शासनाचा महसूल बुडवून सुरू आहे का…

Read Full News

अवैध दारू वाहतुकी विरोधात बांदा पोलिसांची मोठी कारवाई…

५ लाख ९ हजार ३२० रुपयांचा मुद्देमाल जप्त: सावंतवाडी व कणकवलीतील दोघांवर गुन्हा दाखल.. ⚡बांदा ता.१२-: बांदा पोलीस ठाण्याच्या हद्दीत गोवा बनावटीच्या दारूची अवैध वाहतूक करणाऱ्यांविरोधात बांदा पोलिसांनी धडक कारवाई करत दोन दिवसांत दोन स्वतंत्र कारवायांमध्ये वाहनांसह एकूण ५ लाख ९ हजार ३२० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी दोघांविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम १९४९ अंतर्गत…

Read Full News

You cannot copy content of this page