Headlines

स्वतःला इतके सक्षम व यशस्वी करा की दुनिया तुमच्या मागे येईल…

आ. निलेश राणे:सकल मराठा समाजाच्यावतीने जिल्ह्यातील गुणवंत विद्यार्थी व मान्यवरांचा सन्मान.. ⚡​सावंतवाडी ता.१३-: विद्यार्थ्यांना मोलाचा सल्ला देताना ते म्हणाले, “जीवनात निष्ठेला सर्वोच्च स्थान द्या आणि नेहमी साधेपणा जपा. तुम्ही ज्या ज्या क्षेत्रात जाल, तिथे इतके मोठे व्हा की तुमच्या माध्यमातून या सिंधुदुर्ग जिल्ह्याचे उत्पन्न आणि नाव दोन्ही वाढेल. ‘कामयाब नही, काबिल बनो’… स्वतःला इतके सक्षम…

Read Full News

पहिल्याच पावसात ११ केव्ही वीजवाहिनीचे खांब झुकले…

मांगेली परिसरातील ग्रामस्थांत चिंता.. ⚡दोडामार्ग ता.१३-: तालुक्यातील खोकरल धार ते मांगेली कुसगेवाडी आणि देऊळवाडी दरम्यान उभारण्यात आलेल्या ११ केव्ही वीजवाहिनीच्या कामाबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत. कोट्यवधी रुपये खर्च करून उभारण्यात आलेल्या या वीजवाहिनीचे काही लोखंडी खांब पहिल्याच पावसात झुकल्याचे निदर्शनास आल्याने स्थानिक ग्रामस्थांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.सदर वीजवाहिनी रस्त्यालगत उभारण्यात आली असून अनेक ठिकाणी…

Read Full News

नांदगाव उड्डाणपुलाखाली स्ट्रीट लाईट तातडीने लावा…

नांदगाव, असलदे ग्रामस्थांनी महामार्ग अधिकाऱ्यांकडे मांडल्या समस्या ; पर्यटक व प्रवाशांसाठी सुलभ शौचालय , सुशोभीकरण करा.. ⚡कणकवली ता.१३-:मुंबई–गोवा महामार्गावरील नांदगाव परिसरातील विविध प्रलंबित समस्या सोडविण्यासाठी नांदगाव व असलदे गावातील ग्रामस्थांनी महामार्ग प्राधिकरणचे उपकार्यकारी अभियंता उमेश कुमावत यांच्याकडे आपल्या समस्या मांडल्या. यावेळी नांदगाव तिठ्यावर देवगड – निपाणी रस्त्याचा रहदारीचा नाका असताना गेले काही महिने काळोख कशाला…

Read Full News

पावसाचा प्रत्येक थेंब जपण्याचा संकल्प

रेन वॉटर हार्वेस्टिंग व सोलर प्रणालीसाठी घरपट्टीत अतिरिक्त ५ टक्के सवलत; कुणकेश्वर ग्रामपंचायतीचा महत्त्वाकांक्षी निर्णय.. ⚡देवगड ता.१३-:पर्यावरण संरक्षण, जलसंवर्धन आणि अक्षय ऊर्जेला प्रोत्साहन देण्यासाठी कुणकेश्वर ग्रामपंचायतीने महत्त्वाकांक्षी निर्णय घेतला आहे. छतावरील पावसाचे पाणी शास्त्रशुद्ध पद्धतीने संकलित करून भूजल पुनर्भरण करणारी रेन वॉटर हार्वेस्टिंग प्रणाली तसेच एक किलोवॅटपेक्षा अधिक क्षमतेची सोलर ऑन-ग्रीड प्रणाली कार्यान्वित करणाऱ्या करदात्यांना…

Read Full News

बांदा चेकनाक्यावर गोवा बनावटीच्या दारू वाहतुकीवर मोठी कारवाई…

१ कोटी ३६ लाखांचा मुद्देमाल जप्त:बीड येथील चालकावर गुन्हा दाखल.. ⚡बांदा, ता. १३-: बांदा पोलीसांनी चेकनाक्यावर कारवाई करत गोवा बनावटीच्या दारूची मोठी खेप पकडली. या कारवाईत १४ चाकी ट्रकसह तब्बल १ कोटी ३६ लाख ६० हजार ७१६ रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, याप्रकरणी एका चालकाविरोधात महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलिसांनी…

Read Full News

राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त मनसेकडून आंबोलीत विविध सामाजिक उपक्रमाचे आयोजन…

⚡बांदा ता.१३-: मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या १४ जून रोजी होणाऱ्या वाढदिवसानिमित्त महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आंबोली येथील हिरण्यकेशी मंदिर येथे अभिषेकासह विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. अशी माहिती मनसे सावंतवाडी तालुकाप्रमुख मिलिंद सावंत यांनी दिली.राज ठाकरे यांच्या दीर्घायुष्यासाठी व उत्तम आरोग्यासाठी हिरण्यकेश मंदिरात विशेष अभिषेक करण्यात येणार असून, यानिमित्त गरजू कुटुंबांना धान्याचे…

Read Full News

कणकवली पंचायत समितीच्या गावठी आठवडा बाजाराचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते होणार उद्घाटन…

सभापती हर्षदा वाळके यांची माहिती.. कणकवली : पंचायत समिती कणकवली आणि स्नेह सिंधू कृषी पदवीधर संघ, सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने पंचायत समिती कणकवली येथे गावठी आठवडी बाजाराचे आयोजन करण्यात आले आहे. सोमवारी १५ जून २०२६ रोजी पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. याबाबतची माहिती पंचायत समिती सभापती हर्षदा वाळके यांनी आयोजित पत्रकार परिषदेत…

Read Full News

न्यू सबनीसवाड्यातील खड्डे, कचरा व तुंबलेल्या गटारांमुळे नागरिक त्रस्त…

नगरसेवक, प्रशासनाचे लक्ष वेधून दुर्लक्ष: दोन्ही नगरसेवक टक्केवारी मध्ये गुंतलेत,दिपाली सावंत यांचा आरोप; त्वरित दखल घ्या अन्यथा नगरपालिकेला घेराव घालू.. ⚡सावंतवाडी, ता. १३-:सावंतवाडी शहरातील प्रभाग क्रमांक ३ मधील न्यू- सबनीसवडा परिसरातील रस्त्यांची अवस्था अत्यंत खराब झाली असून ठिकठिकाणी पडलेल्या खड्ड्यांमुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. वारंवार नगरसेवक व नगरपालिका प्रशासनाचे लक्ष वेधूनही समस्या सुटत…

Read Full News

पालकमंत्री नितेश राणे रविवार १४ जून रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर…

⚡कणकवली ता.१३-:राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार नितेश राणे हे रविवार १४ जून रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. यावेळी ते जिल्ह्यातील नियोजित असलेल्या विविध कार्यक्रमांना उपस्थित राहणार आहेत. तर ओमगणेश निवासस्थानी पालकमंत्री नितेश राणे हे जनतेच्या गाठी भेटी घेणार आहेत. नियोजित असलेल्या विविध कार्यक्रमांना उपस्थित राहणार आहेत. तर ओमगणेश…

Read Full News

कुडाळमध्ये वृक्षारोपण मोहिमेचा शुभारंभ…

आमदार आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य :भूजल पातळी वाढविण्यासाठी शहरात ५ हजार झाडे लावणार.. ⚡कुडाळ ता.१३-: ‘एकच ध्यास, हरित कुडाळचा विकास’ या टॅगलाईन अंतर्गत आमदार आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून कुडाळ शहरात भव्य अशी तब्बल ५ हजार वृक्षारोपण मोहीम राबवण्यात येणार आहे. त्याचा शुभारंभ माजी आमदार वैभव नाईक यांच्या हस्ते महालक्ष्मी मंदिर पासून करण्यात…

Read Full News

You cannot copy content of this page