सिंधुदुर्गातील टॅक्सी चालकावर गोव्यात भुर्दंड नको…
राजन तेली: गोव्याच्या मुख्यमंत्र्यांकडे भेट घेत केली मागणी.. ⚡सावंतवाडी ता.०३-: सिंधुदुर्गातील टॅक्सी चालक बांधवांना गोवा राज्यांमध्ये होणाऱ्या आर्थिक भुर्दंड कमी व्हावा या मागणीसाठी आज माजी आमदार राजन तेली यांनी गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची भेट घेत चर्चा केली. दरम्यान मोपा एअरपोर्ट मध्ये नवीन जागा भरती होणार आहे; त्यासाठी सिंधुदुर्गातील जास्तीत जास्त युवकांना संधी देण्यात यावी…
