माऊली मित्रमंडळातर्फे उत्तम सूर्यवंशी यांचा सन्मान…

⚡कणकवली ता.०३-: केंद्रप्रमुख उत्तम आनंदा सूर्यवंशी हे सेवानिवृत्त झाले. याबद्दल त्यांचा माऊली मित्रमंडळ यांच्यावतीने सन्मान करण्यात आला. यावेळी मंडळाचे अध्यक्ष राजेंद्र पेडणेकर, अविनाश गावडे, सुभाष उबाळे यांच्यासह सूर्यवंशी यांच्या आई, पत्नी उपस्थित होत्या.
राजेंद्र पेडणेकर यांच्या हस्ते उत्तम सूर्यवंशी यांचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी राजेंद्र पेडणेकर यांनी मनोगत व्यक्त केले. उत्तम सूर्यवंशी यांच्या सेवानिवृत्तीनंतरच्या पुढील आयुष्यासाठी उपस्थितांनी शुभेच्छा दिल्या.

You cannot copy content of this page