⚡वेंगुर्ला ता.०३-: दहावी परीक्षेत ९६ टक्के गुण मिळवून वेंगुर्ला तालुक्यात चौथा क्रमांक पटकाविलेल्या मदर तेरेसा स्कूलची विद्यार्थीनी कु. स्नेहा राजन नार्वेकर हिचा भाजपातर्फे सत्कार करण्यात आला. तिला इयत्ता तिसरीपासूनच साहसी खेळांची आवड असून रायफल व पिस्तूल नेमबाजी स्पर्धेतही तिची राष्ट्रीयस्तरावर निवड झाली आहे. यापूर्वी समुद्रातील जलतरण स्पर्धेतही तिने सहभाग घेऊन राष्ट्रीयस्तरापर्यंत मजल मारली होती.
कु.स्नेहा हिने जेईई या स्पर्धा परीक्षेसाठी तयारी सुरू केली आहे. त्यानंतर नॅशनल डिफेन्स या विषयांमध्ये प्रशिक्षण अभ्यासक्रम पूर्ण करून या विषयातच पुढे करिअर करून आर्मीमध्ये जाण्याची इच्छा तिने व्यक्त केली. सत्कारप्रसंगी भाजपाचे प्रसन्ना देसाई, सुहास गवंडळकर, राजन गिरप, मनवेल फर्नांडी, प्रशांत खानोलकर, बाबली वायंगणकर, वृंदा गवंडळकर, प्रमोद वेर्णेकर, किशोर रेवणकर आदी उपस्थित होते.
फोटोओळी – दहावी परिक्षेसोबतच विविध स्पर्धांमध्ये यश मिळविलेल्या स्नेहा नार्वेकर हिचा सत्कार करण्यात आला.
