देवगड जामसंडे नगरपंचायत हद्दीतील विकास कामांसाठी ४ कोटी ८५ लाखांचा निधी मंजूर…

भाजप नगरसेवक तथा गटनेते शरद ठुकरुल यांची माहिती..

⚡देवगड ता.१७-: खासदार नारायण राणे यांच्या निवडणुकीमध्ये देवगड जामसांडे नगरपंचायत हद्दीतील नागरिकांना दिलेल्या आश्वासनांची पूर्ती आमदार नितेश राणे यांनी केली असून जिल्हा नियोजन मंडळातून ४ कोटी ८५ लाखाचा घसघशीत निधी प्राप्त झाला आहे.

या निधी मधून देवगड जामसंडे नगरपंचायत हद्दीतील प्रभाग क्र.१७ मधील देवगड शेजारील गार्डनमध्ये उर्वरीत सुशोभीकरणची कामे करणे, देवगड जामसंडे नगरपंचायत हद्दीतील प्रभाग क्र. ७ मधील हनुमान घाटी नुतनीकरण व काँक्रिटीकरण उर्वरीत काम करणे.
,पवनचक्की कडील होटेल वेदा ते साटम रेस्टॉरंडकडे जाणाऱ्या रस्त्याचे नुतनीकरण व डांबरीकरण करणे,कान्होजी आंग्रे रस्त्याचे डॉ. बोफळकर यांच्या समोरील बंदिस्त गटार बांधणे, देवगड साईनाथवाडी बोरिंग वरून लघु नळ योजना तयार करणे.देवगड साईनाथवाडी पालकरघर ते दळवीघर संरक्षण भिंत बांधणे,देवगड साईनाथवाडी पालकरघर ते मारुती मंदिर लांबीच्या रस्त्याचे डांबरीकर करणे. व गटार बांधणे.देवगड जामसंडे नगरपंचायत हद्दीतील सर्वे नं. ४९६/अ१/अ१/अ१/अ१/अ१/अ१/अ१ या मिळकतीपासून ते भवानी कॉम्प्लेक्स पर्यंत जाणारा अंतर्गत रस्ता खडीकरण डांबरीकरण करणे.देवगड साईनाथवाडी बोरिंग वरून लघु नळ योजना तयार करणे, देवगड साईनाथवाडी पालकरघर ते दळवी घर संरक्षण भिंत बांधणे, देवगड साईनाथवाडी पालकर घर तै मारुती मंदिर रस्त्याचे डांबरीकरण करणे व गटार बांधणे.ग्रा. मा क १६० मुणगेवार नगरी आनंदवाडी रस्ता ग्रा मा १५९ रस्ता नूतनीकरण करणे,प्रबुद्धनगर येथील प्रकाश जाधव घर ते निवेदिता जाधव यांच्या घरापर्यंत पायवाट कॉक्रिटीकरण करणे, भटवाडी रस्ता आदर्शशाळा ते ओझर उर्वरित RCC बंदिस्त कॉक्रिटीकरण गटार तयार करणे, देवगड जामसंडे टिळकनगर कौस्तुभ जामसंडेकर घर अंतर्गत वसाहत रस्ता ते वेळवाडी सडा उर्वरित रस्ता तयार करणे (भाग 2),देवगड जामसंडे टिळकनगर संतोष मेस्त्री घर ते वेळवाडी भरत मयेकर घर नवीन रस्ता तयार करणे. (भाग 1),प्रभाग क्र. ३ खाकशी परबवाडी साईमंदीर पासून रस्त्याचे नुतनीकरण व डांबरीकरण करणे,देवगड जामसंडे नगरपंचायत हद्दीतील प्रभाग 10 मधील रवी तेली घरापासून गोळवणकर घरापासून राज्यमार्ग १७८ पर्यंत बंदिस्त नाला बांधून त्यावर संरक्षक भिंतीसह उर्वरित नवीन सिमेंट काँक्रीट करणे. (भाग 2),प्रभाग क्र. १४ मधील जामसंडे सोहनीवाडीकडून जाणारा कान्होजी आंग्रे रस्ता ते हापूस होम पर्यंत जगदीश भुजबळ घरापर्यंत रस्ता खडीकरण डांबरीकरण करणे. (भाग 1),प्रभाग क्र. १५ मधील समर्थनगर येथील रस्त्यालगत गटार तसेच महेश लिमये घर ते रामवास भुजबळ घर येथे पावसाचे पाणी जाण्यासाठी मोरी बांधणे,प्रभाग क्र. १५ मधील जामसंडे विष्णूनगर श्री नंदकुमार मोरे यांच्या घराशेजारी सोलार हायमास्ट टॉवर बसविणे,प्रभाग क्र. १५ जामसंडे विष्णूनगर वत्संत वाडकर घर ते जाधव घरापर्यंत पायवाट कॉक्रिटीकरण करणे, जामसंडे वेलवाडी, भटवाडी तिठा बोअरवेलवरुन लघुनळयोजना विस्तार करणे.बाजारपेठ मुणगेकर घराशेजारील संरक्षक भिंत बांधणे व आरसीसी बंदिस्त गटार करणे, आनंदवाडी राममंदीर समोरील बंदिस्त आरसीसी गटार वांधणे,
कावलेवाडी मधील सार्वजनिक विहीर क्र. ५ यावर नवीन छप्पर व चिरेबंदी भिंत व सांडपाण्याची पाईप लाईन टाकणे,कावलेवाडी भिकाजी कावले घर ते पाटाची तळी जवळ जाणारी पायवाटेची रुंदी,वाढवून डांबरीकरण व नुतनीकरण करणे,देवगड जामसंडे नगरपंचायत हद्दीत १० सोलर हायमास्ट बसविणे.आदी विकासकामे यामंजूर असून या निधीमधून केली जाणार आहेत.
देवगड जामसंडे नगरपंचायतीचे गटनेते शरद ठुकरुल यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली आहे. यावेळी नगरसेविका सौ तन्वी चांदोसकर,ऋचाली पाटकर, आद्या गुमास्ते, स्वीकृत नगरसेवक व्ही. सी. खडपकर, शहराध्यक्ष योगेश पाटकर, दयानंद पाटील, दिलेश साटम इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते.
वार्ड क्रमांक ११ मध्ये माजी आमदार अँड अजित गोगटे यांनी या वार्डची सर्व कामे होतील असे आश्वासन दिले होते. वार्ड क्रमांक ११ मधील सर्व सुचवलेली कामे या यादीमध्ये घेण्यात आली आहेत. याबद्दल सर्व ग्रामस्थांनी आमदार नितेश राणे यांचे आभार व्यक्त केले आहेत.

You cannot copy content of this page