युवा पिढीने अंमली पदार्थांपासून दूर राहावे…

पोलीस उपनिरीक्षक प्रतिज्ञा खोत..

⚡मालवण ता.१६-: आजची युवा तरुण पिढी अंमली पदार्थांच्या आहारी गेली आहे. अनेक जण अंमली पदार्थाच्या विळख्यात अडकून त्यांच्या व्यसनामुळे अनेकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. त्यामुळे जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात ड्रग्ज मुक्त सिंधुदुर्ग अभियान व अंमली पदार्थ विरोधी अभियान राबविण्यात येत आहे. युवा पिढीने अंमली पदार्थांपासून दूर राहावे, असे प्रतिपादन मालवण पोलीस ठाण्याच्या पोलीस उपनिरीक्षक प्रतिज्ञा खोत यांनी पोईप येथे बोलताना केले.

जिल्हा पोलीस प्रशासनाच्या ड्रग्ज मुक्त सिंधुदुर्ग अभियान अंतर्गत मालवण तालुक्यातील सौ. इं. द. वर्दम हायस्कुल, पोईप विरण येथे अंमली पदार्थ दुष्परिणाम बाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी पोलीस उपनिरीक्षक प्रतिज्ञा खोत यांनी मार्गदर्शन केले. मसुरे पोलीस दूरक्षेत्रचे श्री. फरांदे, हायस्कूलचे मुख्याध्यापक श्री. कुंभार, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी वर्ग आणि विद्यार्थी उपस्थित होते.

You cannot copy content of this page