मालवणात नारळी पौर्णिमेला पारंपारिक वेशभूषा स्पर्धा…

मालवण व्यापारी संघाचे आयोजन..

मालवण (प्रतिनिधी)

नारळी पौर्णिमेचे औचित्य साधून मालवण व्यापारी संघाच्या वतीने यावर्षी पारंपारिक वेशभूषा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा दि. १९ ऑगस्ट रोजी दुपारी ३ वाजता मारुती मंदिर सोमवार पेठ मालवण येथून सुरु होऊन बंदरजेटी येथे संपेल. त्याचा निकाल व बक्षीस समारंभ त्याच दिवशी ५ वाजता मारुती मंदिर सोमवार पेठ मालवण येथे होईल. सदर स्पर्धा सर्वांसाठी खुली आहे.

या स्पर्धेतील गट क्रमांक १- बालवाडी ते इयत्ता तिसरी साठी प्रथम – रु. १०००/- व प्रशस्त्रीपत्र, द्वितीय- रू. ७००/- व प्रशस्तीपत्र, तृतीय रु. ५००/- व प्रशस्तीपत्र, उत्तेजनार्थ १ रू. ३००/- व प्रशस्तीपत्र, उत्तेजनार्थ २- रु. ३००/- व प्रशस्तीपत्र, गट क्रमांक २ इयत्ता चौथी ते सातवी साठी प्रथम- रु. १५००/- व प्रशस्तीपत्र, द्वितीय रु. १२००/- व प्रशस्तीपत्र, तृतीय – रु. ८००/- व प्रशस्तीपत्र, उत्तेजनार्थ १ रु. ५००/- व प्रशस्तीपत्र, उत्तेजनार्थ २- रु. ५००/- व प्रशस्तीपत्र तसेच दोन्ही गटातील सर्व सहभागी स्पर्धकांना सर्व सहभागी स्पर्धकांना भेट वस्तू व सहभाग प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. स्पर्धकांनी नाव नोंदणी अरविंद सराफ (९४२२४३४८३१) यांच्याकडे दि. १९ ऑगस्ट पर्यंत दुपारी २ वाजेपर्यंत द्यावीत, असे आवाहन करण्यात आले आहे.

You cannot copy content of this page