व्यापाऱ्यांबद्दल सरकारने तातडीने निर्णय घ्यावा;सर्वसामान्य लोकांसाठी पॅकेज जाहीर करावे..
*💫कणकवली दि.०७-:* मिनी लॉकडाऊन सरकारने जाहीर केले, त्याला कोणत्याही प्रकारचे नियोजन दिसून येत नाही. पालकमंत्री येतात आणि हेलिकॉप्टर निघून जातात.जिल्ह्यातील परिस्थितीचा आढावा घेऊन अधिकारी यांच्याशी चर्चा केली पाहिजे.व्यापाऱ्यांबद्दल सरकारने तातडीने निर्णय घ्यावा.मिनी लॉकडाऊनमुळे लोकांचे फार मोठे नुकसान होणार आहे.ठाकरे सरकारच्या मिनी लॉकडाऊनमुळे जनता दहशतीखाली असल्याची टीका भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी केली. कणकवली येथील भारतीय जनता पक्ष कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. अनेकांचे हातावर पोट आहे,टपरी व नाभिक ,छोटे व्यापारी असतील,परंतु दुर्दैवाने कुठल्याही प्रकारची पॅकेज दिले नाही.हातावर पोट असलेल्यांना सरकार पॅकेज देत नाही.करोना काळात शेतकऱ्यांना लाईट बिल माफ करण्याची घोषणा केली होती.मात्र मंत्र्यांच्या भांडणात वीज बिल माफी नाही.मिनी लॉकडाऊन जाहीर करत व्यापाऱ्यांचे कबरंडे मोडले आहे.अनेकांना प्रश्न आहे,खायचं काय? पोलिस येताहेत,दुकाने बंद करायला सांगताहेत.खायचं काय? फिरते व्यावसायिक, रिक्षा व्यावसायिक, दशावतारी कलाकार,नारळ विक्रते अश्या लोकांना काहीतरी सरकारने इतर राज्याप्रमाणे पॅकेज जाहीर करावे.यासाठी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याकडे पाठपुरावा करणार असल्याचे राजन तेली यांनी सांगितले. केंद्राने मोफत धान्य व २० लाख कोटीचे पॅकेज दिले.त्या प्रमाणे राज्य सरकारने पॅकेज जाहीर करावे.मंत्र्याना गाडया घेण्यासाठी पैसे येताहेत,ठेकेदाराला पैसे दिले जातात,बदल्या सर्व विभागात होतात.क्रीम पोस्ट च्या बदल्या होताहेत.पैसे देऊन अधिकारी येत असल्याने कोण कुणाला जुमानत नाही.सर्वसामान्य लोकांना पॅकेज द्या.व्यापाऱ्यांना दिलासा द्या,समन्वयाने निर्णय घ्या.व्यापाऱ्यांना लसीकरण कंपल्सरी केलात तर लस उपलब्ध करुन द्या.याबाबत जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक यांना भेटणार आहे,एक वर्षे लोकं कंटाळलेल्या स्थितीत आहे.त्यामुळे कारवाई करताना विचार करावा,असेही राजन तेली यांनी सांगितले. वाळूचा प्रश्न होता,बाजूच्या गोवा राज्यात वाळू जात होती.आपल्या जिल्ह्यातील गाड्या जाण्यास बंदी केली होती.माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी गोवा मुख्यमंत्री यांच्याशी ताबडतोब वाळू घेऊन जाणाऱ्या लोकांना परवानगी दिली आहे.मायनींग रॉयल्टी मधून १८ रुग्णवाहिका प्राथमिक आरोग्य केंद्रात देतो असे जाहीर केले.पण अद्याप दिली नाही.मात्र आ.नीतेश राणे यांनी आपल्या मतदारसंघात ३ रुग्णवाहिका दिली असल्याचे राजन तेली यांनी सांगितले.
