राणे संपर्क कार्यालय व पंचायत समितीत केक कापून वाढदिवस साजरा..
*💫कणकवली दि.०७-:* भारतीय जनता पार्टीचे कणकवली तालुका सरचिटणीस तथा माजी उपसभापती महेश गुरव यांच्या वाढदिवसानिमित्त राणे संपर्क कार्यालय व पंचायत समिती कणकवली येथे केक कापण्यात आला. या ठिकाणी भाजपा कार्यकर्त्यांनी महेश गुरव यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला. कणकवली पंचायत समिती येथे माजी उपाध्यक्ष संदेश सावंत यांनी महेश गुरव यांना केक भरवत शुभेच्छा दिल्यात, यावेळी भाजपा तालुका अध्यक्ष संतोष कानडे, सभापती मनोज रावराणे,उपाध्यक्ष सोनू सावंत,स्वप्निल चिंदरकर,असलदे सरपंच पंढरी वायगणकर, आशिये सरपंच संदीप जाधव,आनंद घाडीगांवकर,संतोष आंग्रे आदींसह भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते. तर राणे संपर्क कार्यालय येथे महेश गुरव यांना तालुकाध्यक्ष संतोष कानडे यांनी केक भरवत वाढदिवस साजरा केला. यावेळी सोनू सावंत,वागदे माजी सरपंच संदीप सावंत,संदीप भोसले,संतोष चव्हाण,अण्णा कोदे आदींसह भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते.
